पाचोरा जनता प्रबोधन बहुद्देशीय सामाजिक संस्थांचे शहर अध्यक्षपदी अमजद खान याची निवड

पाचोरा जनता प्रबोधन बहुद्देशीय सामाजिक संस्थांचे शहर अध्यक्षपदी अमजद खान याची निवड

पाचोरा : येथील जनता प्रबोधन बहुद्देशीय सामाजिक संस्थाच्या माध्यमातून जिल्हाभरात गोरगरीबांना अन्न वस्त्र निवाराचे सहकार्य केले जात असून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहे.सद्या संस्थेचे कार्य जिल्हाभरात वाढत असून प्रत्येक तालुक्यातील व शहरातील विविध उपक्रम राबविण्यासाठी युवक व सामाजिक कार्य करण्याची निवड केली जात आहे,पाचोरा शहरातील ,आज ८ फेब्रुवारी २०२२ रोजी शहर अध्यक्ष पदी अमजद खान मजीदखान यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली. पाचोरा शहरातील समाजसेवक अमजद खान मजीदखान हे नेहमी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असल्याने त्यांच्या सामाजिक कार्याची व सामाजिक जन जागृतीची संस्थेच्या वतीने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची नियुक्ति करण्यात आली. तसेच भविष्यात संस्थेच्या माध्यमातून समाजाची सेवा करावी व तसेच संस्थेच्या माध्यमातून गोरगरीबांना सहकार्य करुन विविध उपक्रम राबवून समाजाचे विविध समस्याचे निवारण करावे व संस्थेचे संघटन बळकट करावे असे संस्थेच्या वतीने त्याना सांगण्यात आले. व तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.