ऍड. प्रविण पाटील यांची चेअरमन पदी बिनविरोध निवड

ऍड. प्रविण पाटिल यांची चेअरमन पदी बिनविरोध निवड

पाचोरा(प्रतिनीधी)—भडगाव तालुक्यातिल अंतुर्ली बु।।येथिल वि.का.सोसायटीच्या चेअरमन पदी अॅड.प्रविण पाटिल यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यथिल अंतुर्ली बु।। विवध कार्यकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची नुकतीच सभा संपन्न झाली.यावेळी अॅड.प्रविण भिकन पाटिल यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली.या सभेला संस्थेचे माजी चेअरमण रणजित पाटील,शिवाजी पाटील,विकास पाटील,दिनकर पाटील,प्रदिप पाटील,मनोज पाटील, लक्ष्मण पाटिल,दादाभाऊ गोसावी,भगवान पाटील यांच्यासह माजी सरपंच रविंद्र पाटील,ग्रामपंचायत सदस्य मनोज रामराव पाटील,संस्थेचे सचिव श्री.देसले आदी उपस्थित होते.बिनविरोध चअरमनपदी निवड झाल्याबद्दल उपस्थितांनी अॅड.प्रविण पाटील यांना शुभेच्छा देत सत्कार केला.तसेच पाचोरा तालुका वकिल संघातर्फेही त्यांचा सत्कार करण्यात आला.त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वञ अभिनंदन होत आहे.