धुळे जिल्ह्य़ातील ग्रामपंचायत कार्यालयात बायोमॅट्रीक हजेरी प्रणाली बसविण्यात यावी जितेंद्र पावरा यांची मागणी

धुळे जिल्ह्य़ातील ग्रामपंचायत कार्यालयात बायोमॅट्रीक हजेरी प्रणाली बसविण्यात यावी जितेंद्र पावरा यांची मागणी….

शिरपुर :- धुळे जिल्ह्य़ातील ग्रामपंचायत कार्यालयात बायोमॅट्रीक हजेरी प्रणाली बसविण्यात यावी अशी जितेंद्र पावरा – युवा कार्यकर्ता यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी धुळे, जिल्हाधिकारी धुळे, यांना Email अर्जाद्वारे मागणी केली आहे….
निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील अनेक ग्रामपंचायती मध्ये असे निर्दशनास येत आहे कि ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ग्रामस्थांना अनेकदा कार्यालयात भेटत नाहीत त्यामुळे सर्व सामान्यांच्या कामाचा अणि वेळेचा खोळंबा होतो याला आवर करण्यासाठी आता कोकणातील ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत राज्याच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी एका पत्राद्वारे राज्यातील कोकण,पुणे,नाशिक,औरंगाबाद,अमरावती, नागपुर,विभागिय आयुक्तांना ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांना ग्रामपंचायत कार्यालयात बायोमॅट्रीक हजेरी प्रणाली लागु करण्याचे निर्देश दिले आहेत व प्रवेश द्वारावर जन माहीती अधिकारी फलक लावण्याबाबत सांगण्यात आले आहे.
तरी वरील संदर्भिय पत्राचा आशय लक्षात घेता आपल्या ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता येण्याच्या हेतूने व ग्रामसेवेकांच्या कार्यप्रणालीत सुधारणा व्हावी म्हणुन आपल्या ग्रामपंचातीमध्ये विनाविलंब बायोमॅट्रीक हजेरी प्रणाली बसविण्यात यावी अशी मागणी जितेंद्र पावरा युवा कार्यकर्ता नवागांव यांनी केली आहे.