सृजनातमक सुबक पणा साठी “रंधा “आवश्यक डॉ.अनिल कुलकर्णी

सृजनातमक सुबक पणा साठी “रंधा “आवश्यक
डॉ.अनिल कुलकर्णी

शब्दान्वय प्रकाशन, मुंबई यांनी नुकतीच भाऊसाहेब मिस्तरी यांची जीवनाचं वास्तव दर्शन घडवणारी ‘रंधा’ कादंबरी प्रकाशित केली आहे.
भाऊसाहेब मिस्तरी यांनी ग्रामीण जीवनातील दुःख, दारिद्र्य, ग्रामीण जीवनाचे वर्णन, वाचकांच्या डोळ्यांसमोर वास्तव रूपात कल्पकता, स्वप्नरंजन, अलंकारिक भाषा याला रंधा मारून आपल्यासमोर एक अस्सल ग्रामीण सुबक कलाकृती पेश केली आहे. ग्रामीण भागातल्या संघर्षाची धार व ग्रामीण भागात प्रचलित असलेल्या ओव्याचा वापर करून मानवी संबंधांची अतिशय तरल उकल त्यांनी केली आहे.
अण्णा मिस्तरी यांच्या कुटुंबाची ही कथा आहे. शेतकऱ्यांना शेतात लागणाऱ्या अवजारांचे अण्णा वर्षभर काम करत असें.
ग्रामीण भागात २-३विवाह व ५-६ मुले असणें, भविष्यावर विश्वास ठेवणें,हे नवीन नाही.कमीतकमी गरजां बाळगत व आशावादी राहून जीवनाला ते सामोरें जातात,हे शिकण्या सारखं आहे. मुलें शाळे बरोबरच सुतारकाम
करत वडिलांनाही मदत करत. आपल्या वडिलांचे कष्ट पाहून मुलेही दुःखी होत व वडीला प्रती त्यांना आदरच वाटतो. वडील म्हणजे
‘ सुखाचा सागर, कष्टाची भाकर, हक्काचे घर आयुष्याचा गर वाटतो, काटेरी फणस वरून पण आतून गोड रस, कष्टाचा घामाचा वास, मनातलं झाड, आंब्याचे झाड, सावली देणारे झाड, जिवंत पाण्याचा झरा, थंडगार वारा, आयुष्याची वाट, एक कष्टाचा पाठ ,कस्तुरीचा सुगंध, पहिल्‍या पावसाचा गंध, आनंदाचा कंद, तुपाची धार, सुट्टीचा वार आणि आयुष्याचा सार वाटतो’.
कथा, कादंबऱ्या, नाटक, चित्रपट या माध्यमातून खरें वास्तव ग्रामीण जीवन समाजासमोर येत नाही. ग्रामीण भागात आज अनेक पारंपारिक व्यवसाय कोलमडत आहेत. पूर्वी परंपरेने आलेले व्यवसाय करून धान्याच्या स्वरूपात या धान्यातून उदरनिर्वाह चालत असे. पण बलुतेदारी हळूहळू संपुष्टात आली आहे.
ग्रामीण भागात जनावर वऔजार यांच्या भरवशावरच कुटुंब जगत होती,व जगतात.
ओबड धोबड लाकडाला रंधा मारल्यावरच बाजारात त्याला जास्त किंमत येते.
आजचं कल्चर फर्निचरचं आहे. दिवाणखान्यात प्रत्येकाला सुबक फर्निचर हवं. ग्रामीण भागातला शेतकरी, कारागीर व ते वापरत असलेले औजारे आमच्या नवीन पिढीला माहित नाहीत व माहिती करून घेण्याची गरजही वाटत नाही.
ग्रामीण भागातील खेडी उद्ध्वस्त होण्यापासून वाचवायची असतील तर तेथील संस्कृती माहित करून त्याचे जतन करणे आवश्यक असते.
संस्कृती जतन करण्यासाठी संकृती माहीत असणे आवश्यक आहे आहे व त्याचे संवर्धन सातत्याने व्हायला हवे.
आजही ग्रामीण भागात जुन्या परंपरेनुसार चालत आलेल्या गोष्टी जपल्या जातात. विज्ञानामुळे प्रगती होत असली तरीही परिस्थितीमुळे काही शेतीच्या जुन्या पद्धती व अवजारांची पूजा केली जाते, त्याच्यावरच अनेकांचे संसार उभे असतात.
माणसाचे स्वभाव, अंधश्रद्धा इतक्या सहजासहजी बदलत नाहीत. निर्जीव लाकडाला हवा तसा रंधा मारून सुबकता आणता येतें,लाकडाचा बेढपपणा घालवून सुंदर आकार देता येतों.
मानवी मनाचं तसं नाही. मानवी मनाला संस्काराचा रंधा आवश्यक असतो. शरीराला व मनाला वळण लागण्यासाठी शिस्तीचा रंधा आवश्यक असतो.अनावश्यक रूढी,परंपरा यांना रंधा मारून त्या जात नाहीत. मन परिवर्तन व मत परिवर्तन संस्काराच्या हळूवार रंधा मारल्यने शक्य होते.
जीवनात एक प्रश्न संपला की दुसरा उभा टाकतो. उद्या काय खाणार याची भ्रांत असतें पण अशाही परिस्थितीत फक्त आशें वर माणसें जगतात. पिल्लांच्या पंखात जगण्याचे बळ येवों इतकच स्वप्नं पहात अनेक कुटुंब जगतात. संघर्षातून सुरू झालेली कहाणी संघर्षातच जगतें व संपते अशी अनेक कुटुंबं आजही यशस्वी नसली तरीही सुखासमाधानाने जगतात.
कादंबरीची भाषा ओघवती आहे.शब्दान्वय प्रकाशन ची पहिली कलाकृती व नितीन खिलारे यांचं मुखपृष्ठ रंधा मारल्यासारखं सुबक झाले आहे.

रंधा : भाऊसाहेब मिस्तरी
शब्दान्वय प्रकाशन : मुंबई
पृष्ठे. २२3
स्वागत मूल्य : ३00 रू.
कादंबरी घरपोच मिळवण्यासाठी
फोन पे आणि संपर्क नंबर:
9321773163
प्रभाकर पवार