चोपडा महाविद्यालयात ICICI बँक तर्फे ‘रोजगार मेळाव्याचे’ आयोजन

चोपडा महाविद्यालयात ICICI बँक तर्फे ‘रोजगार मेळाव्याचे’ आयोजन

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात ‘ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल’, आय.सी.आय.सी.आय बँक व NIIT मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२४ फेब्रुवारी २०२३ रोजी ‘रोजगार मेळाव्याचे’ आयोजन महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील तसेच संस्थेच्या सचिव डॉ. सौ. स्मिताताई संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवम सिंग (सिनीअर बिझिनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह, आय.सी.आय.सी.आय बँक व NIIT मुंबई) व डॉ.के.डी.गायकवाड (समन्वयक, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल) आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्या कार्याचा आढावा घेतांना तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना डॉ.के.डी.गायकवाड म्हणाले की, ‘विद्यार्थ्यामधील कौशल्य ओळखून त्यांना व्यक्तिमत्त्व विकासाच्या मार्गावर पोचविणे, त्यांच्यातील कौशल्ये विकसित करून रोजगाराभिमुख कोर्सेस च्या माध्यमातून स्वयंरोजगार संधी उपलब्ध करून देणे हा उद्देश या नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यामागचा आहे.’
या रोजगार मेळाव्यात एकूण ९२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.या वेळी सहभागी विदयार्थ्यांची नावनोंदणी करून पात्र विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. निबंध लेखनाच्या माध्यमातून लेखनशैली तपासण्यात आली. मुलाखत घेऊन विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य जाणून घेतले.
यावेळी शिवम सिंग यांनी विद्यार्थ्यांना मुलाखत कशी द्यावी? लेखन कौशल्ये, संवाद कौशल्ये विकसित करण्याविषयी मार्गदर्शन केले तसेच मुलाखतीविषयीचे गैरसमज दूर केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली.यावेळी ते मार्गदर्शन करतांना म्हणाले की, ‘विद्यार्थी हित जोपासण्यावर आपले महाविद्यालय भर देते. म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्यामधील कौशल्ये विकसित करावी. वाचन करून स्वतःमधील आत्मविश्वास वाढवावा. याचा विद्यार्थ्यांना रोजगार संधी प्राप्त करण्यास मदत होईल.’
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी म्हणाले की, ‘ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थ्यांना याचा भविष्यात निश्चितच फायदा होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करावा.नोकरी मिळविण्यासाठी विविध संधींचा शोध घ्यावा. नवतंत्रज्ञाच्या माध्यमातून रोजगार संधी उपलब्ध होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना या माध्यमातून रोजगार संधी उपलब्ध होतो.’
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.आर.आर. पाटील यांनी केले तर आभार डॉ.एम.एल.भुसारे यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समिती सदस्य एम.ए.पाटील, करिअर कट्टाचे समन्वयक वाय.एन.पाटील, डॉ.एच.जी.सदाफुले तसेच धीरज राठोड यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.