FFR (FRACTIONAL FLOW RESERVE)…” हृदयरोग विश्वातील एक वरदान”

FFR (FRACTIONAL FLOW RESERVE)…” हृदयरोग विश्वातील एक वरदान”

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील “प्राईम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल” मधील प्रसिद्ध आणि निष्णात हृदयरोग तज्ञ डॉ.अंकुर अनिल झवर यांनी आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. जळगाव येथील शाहू महाराज हॉस्पिटल येथे FFR म्हणजेच fractional Flow Reserve या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णाला एक नवसंजीवनी त्यांनी दिली आहे.

५१ वर्षीय श्री.भूषण हिंगे यांनी छातीत दुखणे, दम लागणे, या लक्षणांसह डॉ. अंकुर यांना दाखवले असता त्यांनी अँजिओग्राफी करण्याचा सल्ला दिला, त्यामध्ये त्यांना २ ब्लॉकेजेस आढळले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा म्हणजेच FFR मधील “पुल बॅक टेकनिक” चा वापर करून त्यांनी गरज नसताना लागणारे “स्टेंटिंग” थांबवले आहे, आणि फक्त महत्त्वाच्या असलेल्या “ब्लॉक” लाच स्टेंटिंग केले आहे

असे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून रुग्णाला नवसंजीवनी देणारे जळगाव जिल्ह्यातील शाहू हॉस्पिटल मधील पहिलेच हृदयरोग विशेषज्ञ ठरले आहेत, त्यासाठी त्यांचे साऱ्या पंचक्रोशीत कौतुक होत आहे, त्यांनी सुद्धा अशीच रुग्ण सेवा पुढे सुद्धा करण्याची जणू एक प्रतिज्ञाच केली आहे.