चोपडा महाविद्यालयात दि.३१ जानेवारी व ०१ फेब्रुवारी रोजी ‘वार्षिक स्नेहसंमेलनाचे’ आयोजन

चोपडा महाविद्यालयात दि.३१ जानेवारी व ०१ फेब्रुवारी रोजी ‘वार्षिक स्नेहसंमेलनाचे’ आयोजन

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात दि.३१ जानेवारी व ०१ फेब्रुवारी २०२३ रोजी ‘वार्षिक स्नेहसंमेलनाचे’ आयोजन करण्यात आलेले आहे. या स्नेहसंमेलनात विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, आनंद मेळावा इत्यादींचे आयोजन करण्यात आलेले आहे. या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उदघाटन नंदुरबार येथील अहिराणी विनोदी लोककलाकार श्री. विजय पवार यांच्या हस्ते होणार असून सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन चोपडा येथील ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. संदीप उत्तमराव दुनगहू यांच्या हस्ते होणार आहे. त्याचप्रमाणे चोपडा येथील हरताळकर हॉस्पिटलचे सर्जन डॉ.विनीत हरताळकर यांच्या हस्ते पाककला व रांगोळी स्पर्धेचे उदघाटन होणार आहे तर चोपडा येथील हरताळकर हॉस्पिटलच्या रेडीओलॉजिस्ट डॉ.सौ.नीता हरताळकर यांच्या हस्ते रांगोळी व मेहंदी स्पर्धेचे उदघाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील हे उपस्थित राहणार असून संस्थेच्या उपाध्यक्ष श्रीमती. आशाताई विजय पाटील तसेच संस्थेच्या सचिव डॉ.सौ. स्मिताताई संदीप पाटील आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. दि.०१ फेब्रुवारी २०२३ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या समारोप व बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमात चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.अजित सावळे हे उपस्थित राहणार आहेत. तरी या स्नेहसंमेलनामध्ये महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा तसेच उपस्थित राहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी, उपप्राचार्य श्री. एन.एस.कोल्हे, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री.बी.एस.हळपे, पर्यवेक्षक व कनिष्ठ विभागाचे स्नेहसंमेलन प्रमुख श्री.एस. पी.पाटील तसेच वरिष्ठ विभागाचे स्नेहसंमेलन प्रमुख श्री.डी.पी.सपकाळे यांनी केले आहे.