अवघ्या 67 वर्षच्या संतोष दौलत पाटील यांनी 89 दिवस पायी चालत नर्मदा परिक्रमा केली पूर्ण 

अवघ्या 67 वर्षच्या संतोष दौलत पाटील यांनी 89 दिवस पायी चालत नर्मदा परिक्रमा केली पूर्ण

श्री संतोष दौलत पाटील देवपिंपरी ता. जामनेर जिल्हा जळगाव यांनी वयाच्या 67 व्या वर्षी दिनांक 31 /10 /2022 ते 27 /1 /2023 असे प्रदीर्घ असे एकूण 89 दिवस पायी नर्मदा परिक्रमा केली त्यांचे आगमन 30/01/2023 वार सोमवार सकाळी 8.00 वाजता देवपिंपरी येथे भव्य दिव्य अशा प्रकारची मिरवणूक काढण्यात आली गावात आल्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पुढे गावामध्ये भजनी मंडळ यांनी व्यंकटेश मंदिर पर्यंत 9.30 ते 1.00 अशी मिरवणूक काढली 1.00 ते 3.00 यावेळेस कीर्तनाचा कार्यक्रम झाला त्यानंतर स्नेहभोजन झाले या सर्व कार्यक्रमाचे नियोजन देवपिंपरी येथील गावकरी भजनी मंडळी नातेवाईक मंडळी तसेच त्यांच्या मुलाचा मित्रपरिवार यांनी घोडा गाडी डीजे अशाप्रकारे आनंदी वातावरणात कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पाडला त्यांचे अनुभव कथन करीत असताना त्यांनी सांगितले की अतिशय खडतर अशा जंगलातून सुद्धा दररोज 35 किलोमीटर अंतर ते चालत होते असे एकूण ते जवळपास 4000 किलोमीटर आंतर ते पायी चालले परंतु जंगलात सुद्धा नर्मदे मातेचे भक्त कुठल्याही प्रकारचा शुल्क न घेता मोफत अशा प्रकारचे अन्नदान व सर्व उच्च प्रतीच्या सुविधा त्यांना मिळत होत्या हा खडतर प्रवास करत असताना एवढ्या दिवसांमध्ये त्यांच्या अनंत भक्ती मुळे त्यांना कुठलाही त्रास झाला नाही तसेच त्यांना प्रसन्न वाटले त्यांच्यासोबत त्यांचे जावई श्री बंडू शिवाजी बिऱ्हाडे उमाळा व त्यांचे मित्र विलास रमेश बिऱ्हाडे हे सुद्धा होते हे सर्व केवळ त्यांची नर्मदे मातेवर असलेली भक्ती यामुळे शक्य झाले असे त्यांनी सांगितले.