पाचोर्‍यातील आयसीआय बॅकेत 50 रुपयाचे बंडलाचा भरणा घेण्यास नकार

पाचोर्‍यातील आयसीआय बॅकेत 50 रुपयाचे बंडलाचा भरणा घेण्यास नकार

कॅशियरचा मनमानी कारभार: वरिष्ठ अधिकारी यांनी दखल घेण्याची मागणी

पाचोरा प्रतिनिधी: पाचोरा येथील आय.सी.आय बैंक शाखेत 18 जून रोजी ई काॅम एक्सप्रेस या कुरियर कंपनीच्या कॅशचा भरणा करण्यासाठी कर्मचारी गेले होते. त्यांनी सदर भरणा करण्यासाठी आणलेली रक्कम हि कॅशियरकडे दिली त्यात पंन्नास रुपये चे नोटाचे बंडल होते हे पाहुन सदर बॅंकेच्या कॅशियरने चक्क भरणा च स्विकारण्यास नकार दिला. याबाबत त्यास विचारले असता त्याने कुठलेही कारण न देता पंन्नास रुपये चे नोटाचे चलन घेण्यास नकार दिल्याने ई काॅम एक्सप्रेस या कुरियर कंपनीच्या कर्मचारी हे आश्चर्य चकित झाले. त्यांना भरणा अर्जंट आणि महत्वाचा असलेल्याने त्यानी सदर भरणा हा पाचोरा शहरातील एच.डी.एफ.सी च्या बैंक शाखेत भरणा करावा लागला. सदर घटनेची माहिती त्यानी प्रस्तुत प्रतिनिधी यांना दिली असता सदर प्रस्तुत प्रतिनिधी ने पाचोरा आय.सी.आय.बैंक शाखेतील बैंक मॅनेजर यांना घडलेला प्रसंग सांगितला असता त्यांनी सुध्दा उडवाउडवीची उत्तरे दिली तरी अशा बेजबाबदार पणे काम करणारे आय.सी.आय.बॅंकेचे कर्मचारी व अधिकारी यांच्यावर वरिष्ठ अधिकारी यांनी दखल घेवुन कारवाई करण्याची मागणी होत आहे.