शेअर मार्केटच्या नावाखाली ८० लाख ३० हजार रुपयाला गंडा घालणाऱ्या फरार आरोपी आदित्य अंधारेच्या शेवगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या

शेअर मार्केटच्या नावाखाली ८० लाख ३० हजार रुपयाला गंडा घालणाऱ्या फरार आरोपी आदित्य अंधारेच्या शेवगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालणाऱ्या शेअर मार्केट घोटाळ्यात अनेक भामट्यांनी आपले उखळ पांढरे करून घेतले होते.याचे जास्त प्रस्थ अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील अनेक गावांत होते.अशाच एका प्रकरणात प्रशांत महादेव नलावडे (वय३६),राहणार, विद्यानगर ,शेवगाव यांनी शेवगाव पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनीच्या नावाने “इन्फिनिटी ट्रेडिंग मल्टीसर्विसेस” या नावाने शेवगाव शहरातील शिवनगर भागात आणि पुणे येथे कंपनीच्या नावाखाली लाखो रुपयांची उलाढाल करुन फिर्यादी आणि साक्षिदार यांचा विश्वास संपादन करून फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते. शेवगाव पोलिस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ६८०/२०२५भादवी कलम ४२०,४०९,४०६ महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ प्रमाणे दिनांक ५/८/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.वरील नमूद गुन्ह्यातील फरारी आरोपी बाबद माहिती घेतली असता सदर आरोपी हा अनेक महीन्यापासुन शेवगाव शहर सोडून फरार झाल्याची माहिती मिळाली होती.त्याची तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती घेतली असता तो पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील नर्हे या गावात असल्याची माहिती मिळाली होती. मग शेवगाव पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब यांनी एक पोलिस पथक तयार करून ते पथक सदर आरोपीच्या मागावर पुण्याच्या दिशेने रवाना केले. नमुद गुन्ह्यातील फरार आरोपी आदित्य कुंदा अंधारे (वय२५) राहणार शिवनगर, शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर हा पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील नर्हे या गावात असल्याची माहिती मिळाल्याने तेथे जाऊन सदर आरोपीचा तपास करीत असताना आरोपीला पोलिस पथक आल्याची चाहूल लागताच तो पळून जात असताना त्याला महर्षी कर्वे फॅशन काॅलेज इन्स्टिट्यूट येथुन मोठ्या शिताफीने पाठलाग करून रंगेहाथ पकडले आणि त्यांच्या मुसक्या आवळून त्याला दिनांक ५/८/२०२५ रोजी शेवगाव न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी दिली आहे.सदर आरोपीने कोणत्याही व्यक्तींची फसवणूक केली असल्यास त्यांनी शेवगाव पोलिस स्टेशनला बिनधास्तपणे संपर्क साधावा असे आवाहन शेवगाव पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब यांनी केले आहे.सदरची कारवाई ही अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे साहेब, आणि शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शेवगाव पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब,पोलिस सब इन्स्पेक्टर बाजीराव सानप,पोलिसहेड कॉन्स्टेबल किशोर काळे,पोलिस कॉन्स्टेबल शाम गुंजाळ,भगवान सानप, दादासाहेब खेडकर, राहुल आठरे, ईश्वर बेरड,राजू बडे, सचिन पिरगळ, रोहित पालवे, नगर दक्षिण सायबर सेलचे पोलिस काॅंन्स्टेबल राहुल गुड्डू यांनी केली असून पुढील गुन्ह्याचा तपास पोलीस सब इन्स्पेक्टर बाजीराव सानप हे करीत आहेत.शेअर मार्केट घोटाळ्यात अनेकांशी आपले हात ओले करून घेतले होते.पण त्याची परतफेड थेट पोलिस कोठडीत जाऊन होत आहे.शेअर मार्केट घोटाळ्यातील अजूनही अनेक मासे राजरोसपणे बाहेर फिरत आहेत त्यांच्या ही थोड्याच दिवसात मुसक्या आवळल्या जातील फक्त फसवणूक झालेल्या लोकांनी आपली तक्रार घेऊन पुढे येण्याची गरज आहे.संशयित आरोपीवर तातडीने कारवाई केली जाईल असे शेवगाव पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब यांनी सांगितले.