भोगवटा वर्गदोनच्या जमिनीचे हस्तांतरण रोखा अन्यथा उपोषणाचा इशारा

भोगवटा वर्गदोनच्या जमिनीचे हस्तांतरण रोखा अन्यथा उपोषणाचा इशारा

देवणी (प्रतिनिधी)तालुक्यात वर्ग दोनच्या जमिनी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत स्थानिक जमीन माफिया यांचा त्याच्यावर डोळा ठेऊन त्या जमिनी घशात घातल्या जात आहेत.दुय्यम निबंधक कार्यालयांना हाताशी धरून अवैद्य मार्गाने व्यवहार केले जात आहेत .वर्ग दोन च्या जमिनी हस्तांतरण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची रीतसर परवानगी घेउन आवश्यक तेवढे शुल्क भरावे लागतात.त्यासाठी आवश्यक असणारे चलन भरावे लागते.मात्र निबंध कार्यालयाला हाताशी धरून नियम बाजूला सारले जात आहेत. मुद्रांक विक्रेते हे ए जनटाची भूमिका बजावत असल्याचे दिसून येते.दुय्यम निबंधक व जमिनी माफिया यांच्यात असणारे साठेलोटे करण्याचे काम द लालामार्फत केले जाते.याचा फटका सर्वसामान्य मालकी जमिनीच्या मालकांना विक्रेत्यांना होत आहे .त्यांनी सांगितलेला आकडा कार्यात नाही मिळाला तर कोणतेही कारण सांगून सर्वसामान्यांचे व्यवहार रोखले जातात.आतापर्यंत अवैध मार्गाने विनापरवानगीने झालेले सर्व व्यवहार नोंद ,दस्त नोंद, रद्द करण्यात यावेत. तसेच सदरच्या जमिनीवर शासकीय कार्यालय क्रीडा संकुल कर्मचारी निवास औद्योगिक वसाहत याचा साठी ते वापरल्या जाव्यात या मागणीसाठी अनेकदा माननीय जिल्हाधिकारी जिल्हा नोंदणी शुल्क अधिकारी दस्त नोंद लातूर यांच्याकडे रीतसर निवेदन देऊन सुद्धा अद्यापही त्या व्यवहारात कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आला नाही याबाबतची दखल घ्यावे अन्यथा दिनांक 27 फेब्रुवारी रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा पृथ्वीराज जीवने यांच्यासह श्रीमंत लुल्ले,योगेश तगरखेडे, करीम शेख ,भगवान पाटील बिरादार यांनी दिला आहे .सदरच्या निवेदनाच्या प्रती जिल्हा निबंध कार्यालय श्रेणी एक, तहसीलदार देवणी, दुय्यम निबंध कार्यालय देवणी ,यांना देण्यात आले आहेत.