सैनिकी मुला/मुलींचे वसतीगृहातील विविध पदांसाठी 25 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सैनिकी मुला/मुलींचे वसतीगृहातील विविध पदांसाठी
25 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव, दि. 7- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या सैनिकी मुला/मुलींचे वसतीगृह येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात रोजंदारी पध्दतीने वसतिगृह अधिक्षक 1 पद (पुरुष), स्वयंपाकी-3 पदे (स्त्री), सफाई कर्मचारी 1 पद (स्त्री) ही पदे माजी सैनिक संवर्गातून भरावयाची आहेत.
तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह 25 जून, 2023 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे सादर करावेत. निवड करण्याचे किंवा एखादा अर्ज कोणतेही कारण न देता निकाली काढण्याचे सर्व अधिकार निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी राखून ठेवले आहेत. अधिक माहितीसाठी ०२५७/२२४१४१४ या दुरध्वीवर संपर्क साधावा. असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रविंद्र भारदे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.