पाचोरा रेल्वे प्रवासी कृती समिती तर्फे धरणे आंदोलन 

पाचोरा रेल्वे प्रवासी कृती समिती तर्फे धरणे आंदोलन
पाचोरा रेल्वे स्टेशनवर
पंजाब मेल ,विदर्भ एक्सप्रेस, च्या थांब्यासह भुसावळ-मुबई पॅसेजर सुरु करण्या बाबद
कोरोना महामारीच्या काळानंतर सुरू झालेल्या रेल्वेच्या यातायातीचे वेळापत्रक फार मोठ्या प्रमाणात बदलले आहे.त्याच्या परिणामी पाचोरा रेल्वे स्टेशनचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे त्यामुळे सायंकाळी सहा वाजेनंतर पाचोरा हून मुंबईत जाण्यासाठी कोणतीही रेल्वे उपलब्ध नाही.त्यासाठी विदर्भ एक्सप्रेस .पंजाब मेल. या दोन गाड्या पाचोरा येथे थांबा मिळावा अशी या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून केली जात आहे
तसेचग्रामीण भागातील जनतेच्या दृष्टीनेअतिशय सोयीचीअसलेली भुसावळ मुंबई पॅसेंजर जी आर्थिक दृष्ट्या गोरगरीब व सामान्यांना परवडणारी पॅसेंजर त्वरित सुरू करावी व लोक भावनांचा आदर करावा
त्याच प्रमाणे देशातील प्रमुख शैक्षणिक केंद्र असलेल्या कोटा राजस्थान व पुणे महाराष्ट्र या ठिकाणी शिक्षणाच्या दृष्टीने तसेच आयटी व हब म्हटले जाणारे बंगलोर या ठिकाणी पाचोरा परिसरातील अनेक तरुण नोकरी व्यवसायासाठी जातात त्यामुळेराजस्थान गुजरात महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांना जोडणाऱ्या गाडी नंबर12627कर्नाटक एक्सप्रेस, गाडी नं 09740साईनगर जयपुरकोटा एक्सप्रेस.
गाडी नं.16501अहमदाबाद बेंगलोर एक्सप्रेस
गाडी नं.16734ओखा रामेश्वर एक्सप्रेसया गाड्यांना पाचोरा येथे थांबा देऊनजनतेला दिलासा मिळावा यासाठी आजचे धरणे आंदोलन करण्यात येत आहे
आंदोलनामध्ये पाचोरा रेल्वे प्रवासी कृती समितीचे कार्याध्यक्ष अँड अविनाश भालेराव,संयोजक नानासाहेब वि टी जोशी.सरचिटणीस सुनील शिंदे.खजिनदार पप्पू राजपूत.उपाध्यक्ष भरत खंडेलवाल नंदकुमार सोनार विकास वाघ गणेश पाटील संजय जडे.विधी सल्लागार. अँड अण्णा भोईटे आनिल आबा येवले शहनाज बागवान किशोर डोंगरे अशोक मोरे बंडू मोरेआधी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते
या आंदोलनाला व्यापारी असोसिएशन शैक्षणिक संस्था डॉक्टर असोसिएशन सराफ असोसिएशन रिक्षा युनियन राजकीय संघटनासामाजिक संघटनायांनी उपोषणासाठी येऊन पाठिंबा दर्शवला