अंतुर्ली बु! ता.भडगांव येथे उपसरपंचपदी मनोज पाटील यांची निवड

पाचोरा ( प्रतिनिधी)
अंतुर्ली बुं॥ ता. भडगाव येथे नुकत्याच झालेल्या लोकनियुक्त सरपंच पदी राष्ट्रवादीच्या उषा कोळी यांचा मोठ्या फरकाने विजय होऊन ,९पैकी ७जागा निवडून आल्या .आज उपसरपंच पदी मनोज प्रकाश पाटील यांची बिनवरोध निवड करण्यात आली.त्यांचा सत्कार पाचोरा भडगांव बाजार समितीचे प्रशासक तथा वि. का.सो चे चेअरमन रणजित पाटील यांचे हस्ते, सत्कार करण्यात आला.या प्रसंगी सरपंच उषा कोळी, रवी पाटील,प्रदीप पाटील ,ग्रा.प.सदस्य मनोज पाटील,भाईदास कोळी,दादाभाऊ बनकर,कोटी नाना,प्रदीप पाटील,निंबा भिल, ग्रां.प.सदस्य,प्रतिभा पाटील,रमाबाई बनकर,निवडणूक निर्णय अधिकारी ठाकरे मॅडम,तलाठी मंडोळे आप्पा आदी ग्रामस्थ उपस्थित होते.