आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते युवराज दामू खेडकर यांचे निधन

निधन वार्ता
युवराज दामू खेडकर
पाचोरा (वार्ताहर)दि,२२
पाचोरा शहरातील नागसेन नगर भागातील रहिवासी तथा आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते,पाचोरा तालूका सहकारी शिक्षण संस्थेचे माजी कर्मचारी युवराज दामू खेडकर वय ६० यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुले दोन मुली नातवंडे असा परिवार असून भय्या खेडकर यांचे ते वडील होत.