रविंद्र घुगे यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर झाल्याबद्दल श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या हस्ते सत्कार

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,जळगाव येथे कार्यरत पोहेकॉ/०३९९ श्री.रविंद्र धोंडू घुगे यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर झाल्याबद्दल मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या हस्ते ॲन्टी करप्शन ब्युरो,नाशिक परिक्षेत्र, नाशिक कार्यालयात त्यांचा सत्कार करून त्यांना प्रशस्तीपत्र देवून त्यांचा गौरव करण्यात आला –

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे कार्यरत असलेले पोहेकॉ/०३९९ श्री.रविंद्र धोंडू घुगे यांची पोलीस दलातील कामगिरी अतिउत्कृष्ट व गौरवपुर्ण असून त्यांची आजपर्यंत झालेल्या एकुण सेवा कालावधीमध्ये त्यांना १९५ बक्षिसे, ०९ प्रशंसा पत्रके व एकुण १० अतिउत्कृष्ट अभिप्राय मिळालेले आहेत. त्यांच्या या कामगिरीचा यथोउचित सन्मान म्हणून त्यांना मा.पोलीस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह जाहीर झाल्याने त्यांचा मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांच्या हस्ते नाशिक ॲन्टी करप्शन ब्युरो,नाशिक परिक्षेत्र नाशिक कार्यालयात सत्कार करून प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. सदर सत्कार समारंभ कार्यक्रमास मा.श्री.एन.एस.न्याहळदे साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मा.श्री.नरेंद्र पवार साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक व मा.श्री.शशिकांत एस.पाटील,पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि. जळगांव व परिक्षेत्रातील सर्व अधिकारी व नाशिक कार्यालयातील सर्व अंमलदार उपस्थित होते.