गोपीचंद पुना पाटील महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा संपन्न

गोपीचंद पुना पाटील महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा संपन्न….!!!!

कोळगाव ता-भडगाव- कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत गोपीचंद पुना पाटील,कनिष्ठ महाविद्यालय आणि कला व विज्ञान महाविद्यालय,कोळगाव,यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.तात्यासाहेब हरि रावजी पाटील पुण्यस्मरण सप्ताहानिमीत्त आज रोजी वक्तृत्व स्पर्धा पार पडली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य संदीप बाविस्कर,क.म.कार्यवाहक प्रा.रघुनाथ पाटील,प्रा.किशोर चौधरी आदि उपस्थित होते.

वक्तृत्व स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे…!!!!

(कनिष्ठ महाविद्यालयीन विभाग)

प्रथम – कु.प्रियंका पाटील
द्वितीय – कु.योगीता परदेशी

(वरिष्ठ महाविद्यालय विभाग)

प्रथम – चि.तुषार पाटील
द्वितीय – कु.कविता महाजन

स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून प्रा.सोनाली सोनवणे व प्रा.मनीषा बोरसे यांनी काम पाहिले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.रामदास पाटील यांनी केले तर आभार प्रा.दिनकर सुर्यवंशी यांनी मानले.

सदर स्पर्धेसाठी प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार,प्र.प्राचार्य संदीप बाविस्कर,क.म.कार्यवाहक रघुनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा समितीतील प्रा.प्रवीण बोरसे,प्रा.उमेश भोसले,प्रा.दत्तात्रय भोसले,प्रा.मनोज पाटील यांनी विशेष मेहनत घेतली,त्यांना महाविद्यालयातील इतर सहकारी शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनींचे मोलाचे सहकार्य लाभले.