पाचोरा रेल्वे स्थानकावर स्वच्छता उपक्रम उत्साहात

पाचोरा रेल्वे स्थानकावर स्वच्छता उपक्रम उत्साहात

पाचोरा — येथील रेल्वे स्थानकावर आज दिनांक 24 सप्टेंबर 2022 रोजी “स्वच्छता दिवस” च्या निमित्ताने सर्व रेल्वे कर्मचारी तसेच श्री शेठ एम. एम. मानसिंगका महाविद्यालयाच्या आर्ट्स, कॉमर्स आणि विज्ञान विभागाचे सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी सहभाग घेत स्वच्छता कार्य यशस्वी केले. केंद्रीय रेल्वे प्रशासन तर्फे आयोजित स्वच्छता पंधरवाडा निमित्त महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे हा उपक्रम हाती घेण्यात आला.

यानिमित्ताने रेल्वे विभागातर्फे मुख्य स्वास्थ्य निरीक्षक श्री हेमराज मीना यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. या कार्यक्रमाला मुख्य स्वास्थ्य निरीक्षक हेमराज मीना यांचे समवेत स्टेशन मॅनेजर एस.टी. जाधव, आर.पी.एफ. भिकन सुरवाडे, तिकीट निरीक्षक नितीन धिवरे, स्वच्छता सुपरवायझर शरद अहिरे, तथा बहुतांशी रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.

एम. एम. महाविद्यालयाचे नव नियुक्त प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, प्रा. पी.आर. सोनवणे, डॉ. के. एस. इंगळे, प्रा एस. बी. तडवी, वाय. बी. पुरी, आर. बी. वळवी, प्रा नितीन एम पाटील, प्रा इंदिरा लोखंडे, अभिषेक जाधव, कमलेश सोनवणे व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.