शहाजापूर (फलकेवाडी) येथे महंत रामगीरी महाराज येळीकर यांच्या काल्याच्या किर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
(सुनिल नजन चिफब्युरो स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील शहाजापूर (फलकेवाडी) येथे पाथर्डी तालुक्यातील येळीच्या क्षेत्र येळेश्वर संस्थान चे प्रमुख महंत रामगीरी महाराज येळीकर यांच्या काल्याच्या किर्तनाने या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. दिनांक ११ ते १८ मे २०२५ या कालावधीत या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात सर्व ह.भ.प.वैष्णवी महाराज तरटे, गणेश महाराज डोईफोडे, अंबादास महाराज क्षिरसागर, मंगलताई महाराज वैद्य,उद्धव महाराज जाधव,शाहू महाराज येवले यांची प्रवचने झाली.तर सर्व ह.भ.प.राम महाराज झिंजुर्के, रामेश्वर महाराज चव्हाण, ज्ञानेश्वर महाराज तांबे, मच्छिंद्र महाराज निकम,आयुष महाराज कुसळकर, कल्याण महाराज शिंदे, बाळकृष्ण महाराज सुडके यांची किर्तने झाली.रवीवार दिनांक १८.५.२०२५ रोजी सकाळी साडे आठ ते साडेदहा या वेळेत ह.भ.प.रामगीरी महाराज येळीकर यांच्या काल्याच्या किर्तनाने आणि लक्ष्मण रघुनाथ फलके यांच्या महाप्रसादाच्या पंगतीने या रौप्यमहोत्सवी गौरवशाली अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली.गेल्या पंचवीस वर्षांपासून या सोहळ्याची सुरुवात झाली होती. हा पंचविसावा अखंड हरिनाम सप्ताह साजरा करण्यात आला. ह.भ.प. राम महाराज येळीकर यांनी सांगितले की आपल्या गुरूने आपल्याकडे प्रसन्न भावनेने पाहिले तर जिवनात आनंद मिळाल्या शिवाय रहात नाही.चांगल्या गोष्टी करण्या करता विनवणी करावी लागते.पंगतीला बसताना अजिबात भेदभाव केला नाही पाहिजे. परमार्थातील कोणतीही गोष्ट ही हळूहळू केली पाहिजे.आजच्या काळातील आईने आपल्या मुलांकडे चांगले लक्ष दिले तर रामराज्य तयार झाल्या शिवाय रहात नाही.काल्याचा प्रसाद सेवन करायचा असेल तर अगोदर भक्तीचे वाटेकरी व्हावे लागते.महाराजांनी गावातील तरूण वर्गाची वर्तनुक पाहून उपस्थित सर्व तरूणांचे कोड कौतुक केले.गावातील देवस्थानसाठी शेवगाव -अहिल्यानगर राज्यमार्गावर देवस्थान या देवस्थानाला नावाने कमान बांधण्यासाठी सुचविले असता त्या कमानी साठी गावातील अनेकांनी सढळ हाताने मदत जाहीर केली.अमरापूरचे रहीवाशी असलेले पोलिस दलातील सहायक फौजदार बाबासाहेब गरड(जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या हस्ते उत्कृष्ट पोलिस म्हणून पुरस्कार प्राप्त), यांनी या कमाणीसाठी पाच हजार रुपये देणगी जाहीर केली.या सप्ताहात गायनाचार्य म्हणून संजय महाराज वारे,भागवत महाराज मरकड,भाऊसाहेब महाराज बडे, काका महाराज मुखेकर यांनी उत्कृष्ट गायन केले. शुभम महाराज डोईफोडे आणि विठ्ठल महाराज डोईफोडे यांनी म्रुदुंगाचार्य म्हणून काम केले.हार्मोनियमवर कुंडलीक महाराज शिंदे व ज्ञानेश्वर महाराज सोनवणे यांनी काम पाहिले.सोमेश्वर पुरूष आणि महिला भजनी मंडळ शहाजापूर आणि ग्रामस्थ यांनी विशेष सहकार्य केले.या अखंड हरिनाम सप्ताह काळात डोईफोडे,तागड, शिंदे,फलके परीवाराच्या वतीने दररोज सकाळ संध्याकाळ अन्नदान करण्यात आले. ह.भ.प. रामगिरी महाराज येळीकर यांनी उपस्थित सर्व श्रोत्यांना आपल्या खुमासदार शैलीत मंत्रमुग्ध केले.गावातील प्रमुख व्यक्तींनी महादेवाचे नवीन मंदिर बांधण्याचा मनोदय व्यक्त केला.पंचक्रोषीतील अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.