पाचोरा कन्या विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

पाचोरा कन्या विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात

पाचोरा – येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक (मीठाबाई) कन्या विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा झाला. ज्येष्ठ शिक्षक प्रा. रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न या कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य संजय पवार, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक पंडित कुंभार, प्रा. शिवाजी शिंदे, प्रा. प्रतिभा परदेशी, श्रीमती प्रतिभा पाटील, निवृत्ती बाविस्कर सुरेखा बडे, कल्पना पाटील, दीपाली लांडगे, विजय पाटील, हेमराज पाटील, मंचावर उपस्थित होते.

माजी राष्ट्रपती,डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब के. एस. पवार यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी तर्फे चेतना डागोर , प्रांजली पाटील, हर्षाली शिंदे, चैताली महाले, नेहा पवार, नंदिनी कुंभार, प्रियंका पाटील, भाग्यश्री मेटकर, सानिका पाटील, जान्हवी पाटील, योगिता पाटील, निधी माळी व जोया खाटीक आदी विद्यार्थ्यांनींनी शिक्षक दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले.

शिक्षक दिनानिमित्त शाळेच्या विद्यार्थिनी शिक्षक बनल्या होत्या. इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून विविध विषयानुसार वेगवेगळ्या वर्गावर त्यांनी अध्यापन कार्य केले.

याप्रसंगी प्रा शिवाजी शिंदे, प्रा. प्रतिभा परदेशी व प्राचार्य संजय पवार यांनी आपल्या मनोगतात शिक्षक दिनाचे महत्त्व स्पष्ट करून सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. रविंद्र चव्हाण यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भारतीय समाज संस्कृतीत गुरुचे स्थान व महत्त्व पटवून देताना विविध दाखले व गोष्टी सांगितल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी धनश्री निळे व प्रांजली पाटील यांनी केले. धनश्री निळे हिने आभार मानले