पाथर्डी पोलिस स्टेशनच्या चौदा गुन्ह्यातील आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

पाथर्डी पोलिस स्टेशनच्या चौदा गुन्ह्यातील आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) एकूण चौदा गुन्हे दाखल असलेल्या फरार आरोपींच्या पाथर्डी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या बाबतची माहिती अशी की अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर १३३३/२०२५ भारतीय न्याय संहितेचे कलमं ३०५(अ),३३१(४), या प्रमाणे दाखल गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी बाळू किशोर कुर्हे, राहणार रंगार गल्ली, पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्या कडे दाखल गुन्ह्या बाबद विचार पुस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. पाथर्डी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. पुढील सखोल चौकशी करीत असताना त्यांने सन २०२४ सालापासून केलेल्या एकूण चौदा गुन्ह्याची कबुली दिली आहे.त्याच्याकडून चोरीचा माल विकत घेतलेल्या एकूण चौघा जणांना ताब्यात घेतले आहे.त्याच्या कडून घरफोडी केलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.चोरीचा माल खरेदी करणारे आरोपी १)गालीब इस्माईल तांबोळी, राहणार,शनि मंदीराजवळ, दिल्ली गेट, अहिल्यानगर,२)तिलक राम तमंग, राहणार,चितळे रोड,दर्गाजवळ, अहिल्यानगर,३) निलेश राम घोगरे, राहणार,संजय नगर,काटवन खंडोबा ता.जिल्हा , अहिल्यानगर,४) कुमार शेखर कुरापट्टी,राहणार, विठ्ठल मंदिरा शेजारी, तोफखाना, अहिल्यानगर ५) अनिता गोपाल दासरी,राहणार, महाले मंगल कार्यालया समोर, गौरी घुमट, अहिल्यानगर यांना पाथर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या सर्वांकडून एकूण ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.वरील आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरची कारवाई ही अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे साहेब, शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शना खाली आणि पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांच्या पथकातील पो.उ.नि.विलास जाधव,पोलिस कॉन्स्टेबल साळवे,बटुळे, सानप यांनी केली आहे.पाथर्डी तालुक्यातील अनेक गावांत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व मोकाट फिरणाऱ्या गुन्हेगारांच्या स्थानिक पोलीसांनी मुसक्या आवळल्या पाहिजेत तरच पाथर्डी तालुक्यातील गुन्हेगारी कमी होईल.