आदर्श शेतकरी श्री .प्रवीण पाटील राजुरी यांची आधुनिक शेतीतंत्रद्यान प्रेरणादायी.डॉ.अनिल देशमुख जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांचे गौरवोदगार

आदर्श शेतकरी श्री .प्रवीण पाटील राजुरी यांची आधुनिक शेतीतंत्रद्यान प्रेरणादायी.डॉ.अनिल देशमुख जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांचे गौरवोदगार

महाराष्ट्र राज्याचे मा .मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते आदरणीय वसंतराव नाईक यांचे जयंती कृषी दिना चे औचित्य साधत राजुरी तालुका पाचोरा येथील कृषी विभाग आत्मा व जिल्हा परिषद आदर्श व प्रगतशील पुरस्कारप्राप्त शेतकरी श्री.प्रवीण रामराव पाटील यांचा अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल देशमुख यांचे हस्ते गुलाबपुष्प व सन्मानपत्र देत जिल्हा कृषी समिती प्रमुख डॉ.एन आर पाटील ,तालुका परिवहन समिती प्रमुख श्री. सुरेश जी तांबे ,तालुका कृषी समिती प्रमुख सौ.अरुणा उदावांत ,संघटक शरद गीते सर,डॉ.अमित देशमुख ,सचिव संजय पाटील ,यांचे प्रमुख स्तुत्उपस्थितीत श्री.राहुल पाटील सरपंच राजुरी यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात स्तुत्य सत्कार करण्यात आला.
त्या प्रसंगी मनोगतात डॉ.अनिल देशमुख जिल्हाध्यक्ष यांनी प्रवीण पाटील यांनी आधुनिक तंत्रज्ञान व नवनवीन शासकीय प्रकल्प योजनांची कास धरीत उभारलेल्या शेती उद्योग हा सर्वच शेतकरी वर्गासाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवपूर्ण उल्लेख करीत श्री.प्रवीण पाटील यांना सन्मानित केले.
या कार्यक्रम प्रसंगी परिवहन समिती प्रमुख श्री सुरेश जी तांबे ,कृषी समिती प्रमुख एन आर पाटील ,सौ.अरुणा उदावांत ,संघटक शरद गीते ,डॉ.अमित देशमुख यांचेही हस्ते श्री प्रवीण पाटील यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.एन आर पाटील यांनी तर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत श्री सुरेश जी तांबे यांचे हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाची सूत्रसंचालन सौ.अरुणा उदावांत यांनी केले .
या प्रसंगी श्री.प्रवीण पाटील आदर्श शेतकरी यांनी शेतीवर आधारित उभारलेले सौरऊर्जा ,शेततळे मत्स्यव्यवसाय,गोमूत्र अमृत खत प्रकल्प व खताचे प्रत्येक फळ झाडा पर्यंत चे वितरण ,फळ झाडाची बांधणी संगोपन,लागलेली फळाचा बहार या सर्वांची पाहणी करीत त्या सर्व फळांची विक्री व्यवस्था या बाबत प्रत्यक्ष पाहणी करीत अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे उपस्थित पदाधिकारी व मान्यवर यांनी केली व खऱ्या अर्थाने आजचा कृषीदिन साजरा झाल्याच्या भावना व्यक्त केल्यात.
आपल्या मनोगतात आदर्श शेतकरी श्री.प्रवीण पाटील आपले मनोगत व्यक्त करीत हा सर्व शेती उद्योग उभारताना आलेल्या पाणी कमतरता अडचणी व अनुभव कथन करीत जिद्द व चिकाटी अभ्यासू वृत्ती वेळोवेळी शासकीय योजनांची पदाधिकारी व कृषी विभाग अधिकारी यांनी केलेले मार्गदर्शन ,आधुनिक तंत्रज्ञान याची संपूर्ण माहिती करून दिली.
कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल देशमुख,जिल्हा कृषी समिती प्रमुख डॉ.एन आर पाटील ,तालुका परिवहन समिती प्रमुख सुरेश तांबे,तालुका कृषी समिती प्रमुख सौ. उदावांत अरुणा ताईसाहेब,मुख्याध्यापिका जिल्हा परिषद शाळा शिक्षिका जयश्री चौधरी,शाळेचे श्री बाळाप्पा पाटील,पशुवैद्यकीय क्षेत्रातील कार्यरत श्री बापूराव पाटील ,संघटक शरद गीते ,डॉ.अमित देशमुख ,सचिव श्री संजय पाटील आदरणीय सरपंच श्री राहुल पाटील ,आदी मान्यवरांची व परिसरातील शेतकरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
श्री.शरद गीते संघटक अखिल भारतीय ग्राहक पंचायत पाचोरा यांनी उपस्थित सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.