जि प.प्राथमिक शाळा राजुरी ता.पाचोरा यांनी राबवला अनोखा उपक्रम -शाळेत केले पॅड बँकेचे उद्घाटन

जि प.प्राथमिक शाळा राजुरी ता.पाचोरा यांनी राबवला अनोखा उपक्रम -शाळेत केले पॅड बँकेचे उद्घाटन

जि. प. प्राथमिक शाळा राजुरी बु.येथे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून शाळेत गावातील किशोरवयीन मुली व महिला यांच्यासाठी पैड बँकेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी घेण्यात आलेला किशोरी मेळावा व महिला मेळावा त्याचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य महिला सुरक्षा संघटना जिल्हाध्यक्ष .ललिता पाटील यांनी भूषविले तसेच या कार्यक्रमास तालुकाध्यक्ष सरला पाटील तालुका उपाध्यक्ष प्रा. वैशाली बोरकर व तालुका सचिव वैशाली जडे तसेच गटसाधन केंद्र पाचोरा येथून दिव्यांग तालुका समन्वयक सीमा पाटील व दिव्यांग विशेष शिक्षक सुनीता पाटील इ. मान्यवर उपस्थित होते. यांचे हस्ते किशोरवयीन व महिला किशोरवयीन मुली व महिला यांच्यासाठी गावात कुठलीही मेडिकल ची व्यवस्था नसल्यामुळे त्यांना वरखेडी किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाऊन पैड आणावे लागतात.मासिक पाळी दरम्यान पॅड वेळेवर मिळत नसल्यानेआरोग्य विषयक समस्या उद्भवतात.ही गरज लक्षात घेऊन त्यांना सॅनिटरी पॅड चीही सुविधा गावाच्या शाळेत उपलब्ध करून देण्याच्या हेतूने शाळेच्या मुख्याध्यापक अरुणा उदावंत व त्यांचे सहकारी ज्ञानेश्वर पाटील व नूतन चौधरी यांच्या सहकार्याने शाळेतच पॅड बँक तयार करण्यात आली‌. उपक्रमाचे गावातील सर्व महिला व किशोरवयीन मुलींनी अभिनंदन व समाधान व्यक्त केले. याप्रसंगी केंद्र शाळेतील शिक्षिका वंदना सोनवणे, कुमुदिनी पाटील, स्वाती पाटील, कविता कदम, उज्वला परदेशी यांनी उपस्थिती देऊन पॅड बँकेसाठी काही सॅनिटरीपॅड ची त्यांच्याकडून मदत केली. या प्रसंगी अध्यक्षीय भाषणात बोलताना ललिता पाटील यांनी महीला व मुलींविषयी कायद्यासंदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती व मार्गदर्शन केले तसेच गावातील किशोरवयीन मुलींसाठी स्पर्धा परीक्षा तयारी ची पुस्तके देऊ केली. वरील सर्व मान्यवरांनी गावातील सर्व भगिनींना मुलींच्या सुरक्षेबरोबरच मुलींवर कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि संस्कार करण्याची खूप आवश्यक गरज आहे‌ असे समजून सांगितले सीमा पाटील यांनी दीव्यांग प्रकार व त्यांना मिळणारे शाळेमार्फत विविध भत्ते याबद्दल माहिती दिली. त्याच बरोबर महिलांविषयक कायदे मुलीन विषयक शिक्षणाच्या वाटा आणि संस्कार यावरही मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद शाळेने केले तर सूत्रसंचालन सावखेडा शाळा सावखेडा खुर्द शाळेच्या उपशिक्षिका गोसावी मॅडम यांनी केले प्रास्ताविक उदावंत मॅडम यांनी तर आभार नूतन चौधरी यांनी मानले याप्रसंगी सावखेडा शाळेच्या मुख्याध्यापिका सुशीला ताई वानखेडे तर तसेच वाडी शाळेचे उपशिक्षिका श्यामल सु सला दे राजश्री आहेर वैशाली ठाकरे उपस्थित होते. सॅनिटरी पॅड बँकेचे उद्घाटन सतत चार पंचवार्षिक पासून ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवडून येत असलेल्या जैनाताई तडवी यांनी केले. पॅड बाजारभाव पेक्षा कमी किमतीत निधी फाऊंडेशन जळगाव च्या संचालिका वैशाली विसपुते यांनी उपलब्ध करून दिले तर ग्रामपंचायतचे महिला सदस्य कविता पाटील अमृता पाटील शेनापदाबाई उभाळे सुरेखाबाई पाटील..पोलीस पाटील मनीषा उभाळे अंगणवाडी ताई मालुताई पाटील माजी सरपंच वैशालीताई पाटील निर्मलाताई पाटील शोभाताई पाटील शाळा व्यवस्थापन समिती महिला सदस्य.आणि गावातील महिला व किशोरवयीन मुली अशी एकूण दीडशेपेक्षा जास्त उपस्थिती होती याप्रसंगी शाळेने संक्रांत सणाचे औचित्य साधून हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील घेतला तसेच महिलांच्या संगीत खुर्ची स्पर्धा घेऊन बक्षीस वितरण केले सर्व महिलांनी व मुलींनी शाळेत माहेर चा आनंद घेतला अल्पोहार व चहा पानी त्यांनी कार्यक्रमाचा समारोप झाला राजूरी टीमने केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सर्व ग्रामस्थ व प्रमुख पाहुणे तसेच पंचक्रोशीतील लोकांनीही कौतुक केले.