नांद्रा येथे दादर पिकाच्या कापणीच्या वेळी आढळले बिबटचे तीन बच्छडे….

नांद्रा येथे दादर पिकाच्या कापणीच्या वेळी आढळले बिबटचे तीन बच्छडे नांद्रा (ता.पाचोरा ) ता.12 येथील वनविभागाला लागुन असलेल्या संजय तावडे यांच्या गट.न.175 मधे आज सकाळी मजुर व मालक दादर पिकाची कापणी करत असतांना मजुरांना दादर पिकात बिबटचे तीन बच्छडे आढळून आल्याने मजुरांमधे एकच घबराहट पसरली हा भाग वनविभागाला लागुन असल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना बिबट्याचे वारंवार दर्शन झालेले आहे.आज पर्यक्ष बच्छडे आढळून आल्याने या भागातील बिबट्याचे वास्तव्य असल्याचा पुरावा मिळाला संद्या रब्बी पिकाची कामे सुरू असल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात दुपारी दोन पर्यत शेतातील कामे करण्यासाठी शेतात असतात.अशीच दादरची कापणी करत असतांना सकाळी 11 च्या सुमारास दादरची कापणी दरम्यान हे बच्छडे आढळून आल्याने शेतकरी भुषन तावडे यांनी बाबतीत वनविभागाला कळवले .घटना स्थळी पाचोरा वनक्षेत्रपाल डि.एस.देसाई यांच्या मार्गदर्शना खाली वनपाल सुनिल भिलावे,वनरक्षक जगदीश ठाकरे,अमृता भोई,ललीत पाटील,प्रकाश सुर्यवंशी ,रामसिंग जाधव ,राहूल कोळी,सचिन कुमावत यांच्या टिमने घटना स्थळीधाव घेऊन संपुर्ण परीसर निर्मनुष्य करुण पुर्णरमिलनासाठी लांब थांबुन लक्ष ठेऊन आहेत. कोट……………………… वारंवार बिबट्याचे शेतकऱ्यांना दर्शन झाल्याच्या तक्रारी बरोबर पाळीव प्राण्यांवर हमला अशा घटना घडत होत्या परंतु आज प्रत्यक्ष बच्छडे आढळून आल्यावर घटना स्थळी आमची टिम आहे.सर्व तो परी खबरदारी घेतली जाईल शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये वन विभागाला सहकार्य करावे दोन तीन दिवस आपली कामे या बच्छळ्यांचे पुर्णरमिलन होई पर्यत थांबवावे. घटना स्थळावर कँमेरे बसवण्याची व्यवस्था करण्यात येईल . डि.एस.देसाई वन क्षेत्रपाल पाचोरा