मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत २ कोटी रुपयांचा निधी मंजूर;आमदार किशोर आप्पा पाटील यांची माहिती.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत २ कोटी रुपयांचा निधी मंजूर;आमदार किशोर आप्पा पाटील यांची माहिती.

पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा – खाजोळा सार्वे बु. तालुका हद्द क्रमांक २२/८६० टी. आर. ०९ येथील पुलाचे निर्माणासाठीचा प्रस्ताव किशोर आप्पा पाटील आमदार पाचोरा यांनी हसन मुश्रीफ ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडे सादर करून पुलाच्या निर्माणासाठी गरज लक्षात आणून दिली. चर्चा गांभीर्यांने घडवून आणली असता झालेल्या चर्चेची तातडीने दखल घेऊन हसन मुश्रीफ यांनी २ कोटी रुपये निधीस मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून दिला असून प्रशासकीय मान्यता देखील प्राप्त झालेली आहे.
सदर विकासकामांना भरीव निधी उपलब्ध करून देणेकामी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी केलेल्या आदेशानव्ये तथा गुलाबरावजी पाटील पालकमंत्री जळगाव, अब्दुल सत्तार साहेब ग्रामविकास राज्यमंत्री यांच्या सहकार्यांने निधी उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे मुख्यमंत्री तथा पालकमंत्री शतशःआभार मानून विकास कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे जनता जनार्दनमध्ये देखील आनंद व्यक्त केला जात आहे