गो.से.हायस्कूल.पाचोरा. येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी

श्री.गो.से.हायस्कूल. पाचोरा येथे कार्यक्रम संपन्न….

आज दिनांक 1 ऑगस्ट 2025 शुक्रवार रोजी श्री. गो.से.हायस्कूल.पाचोरा. येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ.अंजली गोहिल मॅडम,पर्यवेक्षक श्री.आर.बी.तडवी,ज्येष्ठ शिक्षक श्री.पी.एम.पाटील,श्री.एस.एल.वाघ. सर,व ज्येष्ठ शिक्षिका श्री.एस.एस.पाटील.मॅडम यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

याप्रसंगी इयत्ता 5वी ते 7वी च्या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित भाषणं केलीत. सौ.अंजली गोहिल. मॅडम यांनी विद्यार्थ्यांना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवन कार्याची माहिती सांगितली. लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रभक्ती, देशप्रेम ,जाज्वल्य देशाभिमान व समाजातील लोकांना सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती हे उत्सव सुरू करून समाज संघटित कसा केला यावर त्यांनी भाष्य केले. श्री.सागर थोरात.सर यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावरील पोवाडा गायन सादर केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.आर.बी.बोरसे. व आभार प्रदर्शन श्री.रुपेश पाटील.यांनी केले. या कार्यक्रमास इयत्ता 5वी ते 7वीचे सर्व विद्यार्थी व सकाळ सत्रातील सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारीउपस्थित होते.