श्री.सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा येथे आज लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा येथे आज लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती मुख्य इमारत-सकाळ सत्र, दुपार सत्र व भडगाव रोड विभागात साजरी करण्यात आली.सकाळ सत्रात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी.श्रीमती रुपाली पाटील मॅडम,भरो विभागात शाळेचे मुख्याध्यापक श्री. अशोक परदेशी सर तर दुपार सत्रात श्रीमती लक्ष्माबाई सोनवणे मॅडम अध्यक्षस्थानी होत्या. विद्यार्थ्यांनी अतिशय समर्पक शब्दांत लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी माहिती सांगून आपली मनोगते व्यक्त केलीत.ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती.सारिका पाटील मॅडम, श्रीमती.सीमा भदाने मॅडम, श्रीमती.जयश्री पाटील मॅडम,श्री. दीपक पाटील सर,श्री.संदीप वाघ सर, कार्यक्रमाचे म.अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन करून दोन्ही महान नेत्याचा जीवनपट विस्तृतपणे विशद केला.सकाळ सत्रात श्री. रवींद्र महाले सर,भरो विभागात श्री.भूषण पाटील सर,दुपार सत्रात श्रीमती.सुरेखा पाटील मॅडम यांनी सूत्रसंचालन तर आभार प्रदर्शन सकाळ सत्रात श्री. अभिजीत महालपुरे सर,भरो विभागात श्रीमती. रुपाली निकम मॅडम,दुपार सत्रात श्रीमती.योगिता ठाकूर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.