राज्य शासनाचे 70 वर्षे वयावरील निवृत्ती वेतन धारक व कुटुंब निवृत्ती वेतन धारक यांची माहिती 1 ते 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत जिल्हा कोषागार कार्यालयात जमा करावी

राज्य शासनाचे 70 वर्षे वयावरील निवृत्ती वेतन धारक व कुटुंब निवृत्ती वेतन धारक यांची माहिती 1 ते 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत जिल्हा कोषागार कार्यालयात जमा करावी

जळगाव, दि. 2 :- जळगाव कोषागारातुन निवृत्तीवेतन घेणाऱ्या राज्य शासनाचे 70 वर्षे वयावरील निवृत्ती वेतन धारक व कुटुंब निवृत्ती वेतन धारक तसेच इतर राज्याचे 70 वर्षे वयावरील शासनामार्फत निवृत्तीवेतन घेणारे निवृत्तीवेतन धारक यांना कळविण्यात येते की, दिनांक 1 ते 28 फेबुवारी, 2022 या काळात आपण मूळ निवृत्तीवेतन तसेच पती/पत्नी यांची पुढीलप्रमाणे तपशिल – नाव, संपर्क क्रमांक, बँक, ब्रांच , खाते नंबर इ. एका कागदावर नमूद करुन यासोबत आधार कार्ड, पॅन कार्ड व बँक पासबुक प्रथम पानाची छायांकित प्रत जोडून जिल्हा कोषागार कार्यालय जळगाव येथे कार्यालयीन वेळेत आणून जमा करावे. ज्यांना शक्य नाही त्यांनी कार्यालयाच्या to.jalgaon@zillamahakosh.in या ई-मेलवर अथवा इतर व्यक्तीकडे पाठवून द्यावे. असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी श.वा. निकुम यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
००००