महाराष्ट्र राज्य वीज कामगार कर्मचारी अधिकारी अभियंते संघर्ष समिति तर्फे एकतर्फी कार्य पद्धती व खाजगी करण धोरणाविरुद्ध आंदोलन

महाराष्ट्र राज्य वीज कामगार कर्मचारी अधिकारी अभियंते संघर्ष समिति
तर्फे
महाराष्ट्र राज्य वीज उद्योगातील तिन्ही कंपन्यांचे एकतर्फी कार्य पद्धती व खाजगी करण धोरणाविरुद्ध आंदोलन
महाराष्ट्रातील चार वीज कंपन्या मधील कार्यरत सर्व कामगार कर्मचारी अधिकारी अभियंते संघर्ष समिति ची संयुक्त बैठक ९ फेब्रुवारी २०२२ रोजी पनवेल येथे संपन्न होऊन त्यात पुढील महत्त्वाच्या प्रश्नांवर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचा पहिला टप्पा १६ फेब्रू. व २५ फेब्रु. रोजी द्वार सभा निदर्शने घेऊन आज जळगाव मंडळ कार्यालय समोर दुपारी १.३० वाजता सुत्रधारी कंपनी च्या बदली धोरण परिपत्रक ची होळी करण्यात आली.
मागण्या
१. महावितरण, महानिर्मिती, महापारेषन कंपन्यांमध्ये सुरू करण्यात येत असलेले खाजगीकरण त्वरित रद्द करा.
२. केंद्र सरकारचे विद्युत संशोधन विधेयक २०२१ त्वरित रद्द करा.
३. महानिर्मिती कंपनी संचालित असलेले वीज निर्मिती केंद्र खाजगी उद्योजकांना देण्याचे धोरण त्वरित रद्द करा.
४. तिन्ही कंपन्यांतील रिक्त पदे भरण्यात होत असलेली दिरंगाई टाळा.
५. तिन्ही कंपन्या मधील कार्यरत कर्मचारी अधिकारी अभियंते यांच्या बदली धोरणावर एकतर्फी निर्णय रद्द करा.
६. तिन्ही कंपन्यांतील वरिष्ठ पदांवरील अनावश्यक भरती, बदल्या यामधील राजकीय हस्तक्षेप. बंद करा.
या मागण्यांचा समावेश आहे.
आंदोलनाचा कार्यक्रम

१.) १६ फेब्रू.२५ फेब्रू.२०२२ रोजी तिन्ही कंपन्या चे प्रमुख कार्यालय समोर द्वारसभा, निदर्शने. बदली धोरणाचे परिपत्रक ची होळी.
२.) २ मार्च २०२२ रोजी महाराष्ट्र विधान सभा मुंबई अधिवेशन येथे हजारो वीज कामगार कर्मचारी अधिकारी अभियंते यांचा विशाल मोर्चा आयोजित करणे.
३.)१४ मार्च २०२२ रोजी राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी, ग्राहक संघटना, शेतकरी संघटना यांना प्रस्तावित खाजगीकरण बाबत निवेदन देणे.
४.) २८ व २९ मार्च २०२२ रोजी दोन दिवस राज्य व्यापी संप पुकारला आहे. सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी शासन व प्रशासन चे अन्यायकारक व आक्षेपार्ह धोरणाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
आजचे आंदोलन मध्ये कृती समितीच्या स्थानिक पदाधिकारी कॉ. विरेंद्र सिंग पाटिल, कॉ. दिनेश बडगुजर , श्री.आर आर सावकारे, श्री. पराग चौधरी, श्री.कुंदन भंगाळे, श्री.एस के लोखंडे, सुलेमानतडवी, श्री विरघट ,श्री. विजय सोनवणे, सादिक शेख, हिरालाल पाटिल, श्रीमती संध्या पाटिल, बी पी अनुसे, विनोद सोनवणे, मुकेश बारी यांचे सहित सुमारे ४०० वीज कामगार कर्मचारी अधिकारी अभियंते यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला…..
विरेंद्र पाटिल परिमंडळ सचिव
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन जळगाव…..