श्री.गो. से .हायस्कूल पाचोरा येथे शिक्षक दिवस साजरा

श्री.गो. से .हायस्कूल पाचोरा येथे शिक्षक दिवस साजरा

पाचोरा,( प्रतिनिधी)
पाचोरा तालुका सह. संस्था संचलित श्री .गो .से हायस्कुल पाचोरा येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्ण सर्वपल्ली यांची जयंती निमीत्त 5 सप्टे. शिक्षक दिनाचे औचित्य साधून “शिक्षक दिन” साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रमिला वाघ. उपस्थित होते तर त्यांचे समवेत व्यासपिठावर उप मुख्याध्यापक श्री. एन. आर. पाटील ,ज्येष्ठ शिक्षक पी एम पाटील , संगिता वाघ , सौ प्रतिभा पाटील कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन , सरस्वती पूजन डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थ्यांमधून रुचित वाघ यां विद्यार्थ्याने केले तर विद्यार्थी मनोगतासाठी स्तवन भट ,विधी पाटील, देवांशी सावलिया यांनी सहभाग नोंदवला. सूत्रसंचालन किमया पाटील व भूमिका पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार जीविका पाटील हिने मानले कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी सांस्कृतिक विभाग उप प्रमुख आर.बी. बोरसे , सौ शितल महाजन , कलाशिक्षक प्रमोद पाटील, ज्योती ठाकरे , रणजीत पाटील , तसेच सर्व शिक्षक बंधू-भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी सहभाग नोंदविला. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका प्रमिला वाघ यांनी विद्यार्थ्यांना एक भारताचे सुजाण नागरिक बनून शाळेचा नावलौकिक वाढवावा व उच्च पदावर जाऊन आपले व आपल्या वडिलांचे शाळेचे नाव लौकिक करावे असे आवाहन केले.सुरुवातीला एक ते सहा तासिका प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांनी घेतल्या. विद्यार्थी स्वतः शिक्षक झाल्याने शाळेमध्ये मुलांमध्ये खूप उत्साह दिसत होता. मुख्याध्यापिका व उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षिका, शिपाई स्वतः विद्यार्थी झाल्याने अनेक सहभागी विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला व भविष्यात आम्ही याचा बोध घेऊ असा आशावाद त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त करून दाखवला. विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षकांचे गुलाब पुष्प देऊन सत्कार केला व शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.