पाचोऱ्यात डॉक्टर डे निमित्त मॅरेथॉन संपन्न

पाचोऱ्यात डॉक्टर डे निमित्त मॅरेथॉन संपन्न

पाचोरा (प्रतिनिधी)
-पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन तर्फे डॉक्टर डे निमित्त लोकांमध्ये सुदृढ आरोग्याचा संदेश व जनजागृती आणि प्रबोधन करण्यासाठी दि.३ जुलै रविवार रोजी सकाळी ७ वाजता भडगावरोड वरील एमएम महाविद्यालयाच्या ग्राउंड पासून ते स्टेशनरोड वरील हुतात्मा स्मारका पर्यंतडॉक्टर दे निमित्ताने Run For Health (पळा आणि तंदुरुस्त रहा) या संकल्पनेतून मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. डॉक्टरांच्या आरोग्य संवर्धनाच्या उपक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पाचोरा -भडगाव मतदार संघातील राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी हिरवी झेंडी दाखवून मॅरेथॉन चा शुभारंभ केला. या प्रसंगी तहसीलदार कैलास चावडे सौ.प्रतिमा चावडे , पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांची उपस्थिती होती. सदर मॅरेथॉन मध्ये सर्व पुरुष व महिला डॉक्टर्स सहभागी होणार आहेत .या मॅरेथॉनमध्ये पाचोरा डॉक्टर्स असोसिएशनचे पदाधिकारी
चेअरमन डॉ. सुनिल पाटील,
अध्यक्ष डॉ. दिनेश सोनार,
उपाध्यक्ष डॉ. अतुल पाटील,
सचिव डॉ. नंदकिशोर पिंगळे,खजिनदार डॉ.जीवन पाटील, माजी महिला अध्यक्षा- डॉ. प्रिती मगर डॉ. नरेश गवंदे, डॉ स्वप्नील पाटील, डॉ प्रवीण पाटील, डॉ.किशोर पाटील, डॉ.अनिल झवर, डॉ.बन्सीलाल जैन, डॉ आलम देशमुख, डॉ, राजेंद्र चौधरी, डॉ राहुल काटकर, डॉ हर्षल देव, डॉ झकिर देशमुख, डॉ भरत प्रजापत, डॉ निलेश पाटील डॉ चेतन चौधरी, डॉ अमोल बच्छाव, डॉ प्रशांत सांगडे, डॉ दिपक चौधरी, डॉ प्रितेश संकलेचा, डॉ अजय परदेशी, डॉ अनुप अग्रवाल,डॉ प्रशांत शेळके, डॉ विजय जाधव, विशाल पाटील, डॉ प्रवीण माळी, डॉअविनाश शर्मा, यांचे श महिला डॉक्टर- सौ अंजली गवंदे, डॉ.जयश्री सोनार, रुपाली खानोरे, वैशाली पाटील, सरिता अग्रवाल, अंजली शेळके, नेहा परदेशी,किशोरी पाटील, वेदांती महाजन, शीतल सावणेरकर, प्रियंका पाटील, प्रणाली काटकर, अनुपमा भावसार, मधूलिमा चौधरी, सुरेखा पिंगळे,सौ.प्रजापत, सौ मोरे यांचा सहभाग होता . मॅरेथॉन ची सांगता हुतात्मा स्मारकात करण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अर्चना पाटील, डॉ.संजय पाटील तर आभार पाचोरा डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष
डॉ.दिनेश सोनार यांनी मानले.