पिंपळगाव हरे येथील गुरुगोविंद सोसायटी चेअरमन पदी शालिग्राम मालकर यांची बिनविरोध निवड

पिंपळगाव हरे येथील गुरुगोविंद सोसायटी चेअरमन पदी शालिग्राम मालकर यांची बिनविरोध निवड

पाचोरा ( प्रतिनिधी) तालुक्यातील
पिंपळगाव हरेश्वर येथील गुरुगोविंद विविध कार्यकारी सोसायटी ची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच संपन्न झाली यानंतर आज चेअरमन व्हाईस चेअरमन निवड आज संपन्न झाली, यात चेअरमन पदी शालिग्राम ओंकार मालकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर व्हाईस चेअरमन पदी हाजी अनिस खाटीक यांची निवड करण्यात आली, यावेळी पाचोरा भडगाव मतदार संघाचे लोकप्रिय माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी नवनिर्वाचित चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व कार्यकारिणी यांचे स्वागत करून सत्कार केला यावेळी विजय शांताराम सावळे,
राजधर माधव मालकर, राजेंद्र शंकर गीते, जयप्रकाश रतीलाल जैन, नाईक विजयसिंह धर्मा, चव्हाण ज्योतीलाल मोहनदास, बडगुजर बालू तुळशीराम, सुनील संपत क्षीरसागर, श्रीमती जयश्री सुनील बडगुजर, सौ भीमाबाई तोताराम पाटील, सुरेश दत्तात्रय भडांगे हे नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते तर प्रमुख मान्यवर सुखदेव गीते सर, राजुदादा क्षीरसागर, विठ्ठल नारायण गीते, वसंत गीते, विठ्ठल रामदास गीते, रवी जाधव, रवी गीते, राजू माळी, प्रशांत माळी, मौजूलाल जैन, दिलीप जैन, मिलिंद देव, देवेंद्र देव, किरण बडगुजर, शिवदास भुरा राठोड, शिवदास ताराचंद राठोड, बंटी राठोड, अमोल राठोड, योगेश हटकर, धनराज मदने, गुलाम बागवान (गुल्लूशेठ), खुर्शीद मिस्तरी, अर्जुन मालकर, सुरेश मालकर, सुभाष मालकर, शशिकांत मालकर, विजय काळे, विश्वनाथ उभाळे यांचेसह अनेक प्रमुख उपस्थित होते, यावेळी मा आ दिलीपभाऊ वाघ यांनी सर्वांना शुभेच्छा देत भावी वाटचालीस योग्य मार्गदर्शन केले, नवनियुक्त चेअरमन शालिग्राम मालकर यांनी सर्वांचे आभार मानले, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एच बी पाटील यांनी कामकाज केले तर त्यांना संस्थेचे सचिव दीपक बोरसे, कर्मचारी संजय मालकर, दिनेश बडगुजर, अशोक मालकर यांनी सहकार्य केले.