पाचोरा महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा

पाचोरा महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा

पाचोरा दि. 25 जानेवारी – पाचोरा येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा आणि निवडणूक साक्षरता मंडळ, पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जनजागृतीसाठी निबंध व रांगोळी स्पर्धेचे आयोजन महाविद्यालय व निवडणूक साक्षरता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. त्यात निबंध स्पर्धेत 25 तर रांगोळी स्पर्धेत 16 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून मतदार जनजागृती केली. रांगोळी व निबंध दोन्ही स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांकडून मतदानाचे महत्व व मतदानाचा अधिकार या विषयांना उजाळा देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा उपविभागीय अधिकारी मा. श्री. विक्रम बांदल यांनी राष्ट्रीय मतदानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. मतदान हा आपला राष्ट्रीय अधिकार आहे आणि तो आपण बजावलाच पाहिजे असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले. याप्रसंगी पाचोरा तालुक्याचे तहसीलदार मा. श्री. कैलास चावडे यांनी प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे असे आवाहन केले. तर महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रो. डॉ. वासुदेव वले यांनी महाविद्यालयातील नव विद्यार्थी मतदारांना आपला मतदानाचा राष्ट्रीय अधिकार आपण बजावला पाहिजे, मतदानाचा अधिकार हा पवित्र अधिकार आहे. त्याद्वारे आपण उत्तम अशा सरकारची निवड करू शकतो असे आवाहनही केले. याप्रसंगी प्रा. के. एस. इंगळे यांचा उत्कृष्ट महाविद्यालयीन नोडल अधिकारी, डॉ. वाल्मीक अहिरे, श्री. कैलास आमले, श्री. मधुकर बढे, श्री. किरण इंगळे, श्री. निखिल शिरुडे यांचा उत्कृष्ट बी. एल. ओ. तर महाविद्यालयाचा विद्यार्थी चि. बंटी राठोड याचा निवडणूक ब्रँड अँबेसिडर म्हणून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य मा. प्रो. डॉ. जे. व्ही. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य मा. प्रा. जी. बी. पाटील, नायब तहसीलदार मा. श्री. संभाजी पाटील, प्रा. एस. बी. तडवी, प्रा. वाय. बी. पुरी, प्रा. आर. बी. वळवी, प्रा. स्वप्नील ठाकरे, प्रा. नितिन पाटील, प्रा. सुनील पाटील, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी निबंध व रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. रांगोळी स्पर्धेचे परीक्षण मा. सौ. प्रतिभा चावडे व प्रा. माणिक पाटील तर निबंध स्पर्धेचे परीक्षण प्रा. स्वप्नील भोसले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. सुभाष राऊत, श्री. समाधान पवार, श्री. बी. जे. पवार, श्री. जावेद देशमूख, श्री. घन:श्याम करोशिया व श्री. जयेश कुमावत यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. के. एस. इंगळे यांनी केले.