चंद्रपुरात मंगळवारी आम आदमी पार्टीच्या वतीने निर्धार मेळाव्याचे आयोजन

चंद्रपुरात मंगळवारी आम आदमी पार्टीच्या वतीने निर्धार मेळाव्याचे आयोजन

दिल्लीचे नेते तथा प्रदेश प्रभारी दीपक सिंगला, प्रदेश निवडणूक प्रभारी महादेव नाईक, प्रदेशाध्यक्ष रंगाची राचूरे यांचा दौरा

चंद्रपूर :;मंगळवार दिनांक 10 मे रोजी सायंकाळी 5.30 वाजता आम आदमी पार्टीच्या वतीने निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

बालाजी सभागृह बालाजी वॉर्ड येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला दिल्लीचे नेते तथा प्रदेश प्रभारी दीपक सिंगला, प्रदेश निवडणूक प्रभारी महादेव नाईक, प्रदेशाध्यक्ष रंगाची राचूरे, प्रदेश उपाध्यक्ष किशोर मांध्यान, प्रदेश संघटक विजय कुंभार, प्रदेश सचिव धनंजय शिंदे, विदर्भ अध्यक्ष देवेंद्र वानखेडे, प्रदेश कोषाध्यक्ष जगजित सिंग, विदर्भ सचिव अविनाश श्रीराव यांची उपस्थिती राहणार आहे.

तत्पूर्वी जटपुरा गेट ते गांधी चौकापर्यंत बाईक रॅली काढण्यात येणार असून, राष्ट्रीय आणि प्रदेश पदाधिकाऱ्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे.

या कार्यक्रम मेळाव्याला जिल्हा, तालुका पदाधिकारी तथा आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते तसेच जनतेनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, महिला अध्यक्ष ॲड. सुनीता पाटील यांनी केले आहे.