मोराणकर परिवाराचा एक अनोखा सामाजिक उपक्रम

मोराणकर परिवाराचा एक अनोखा सामाजिक उपक्रम

पाचोरा,रंगारगल्ली येथील श्री संदीप भाऊ मोराणकर,श्री अमोल मोराणकर व श्री प्रशांत मोराणकर या तिन्ही भावांनी,
त्यांच्या आई सौ.विजया मोराणकर यांच्या ७३व्या वाढदिवसानिमित्त इतर कुठलाही खर्च न करता, कुठला गाजावाजा न करता सर्व गोष्टींना फाटा देऊन एक सामाजिक उपक्रम म्हणून,

लाडशाखिय वाणी समाजातील एक होतकरू कार्यकर्ता तसेच समाजासाठी नेहमी झटणारे,
तसेच वेळप्रसंगी रक्तदान देणारे, श्री महेंद्रभाऊ महालपुरे यांची,नाशिक येथील लाडशाखिय वाणी समाज सन्मित्र मंडळ या संस्थेमार्फत आजीवन इन्शुरन्स पॉलिसी काढण्यात आली.या पॉलिसीचा सर्व खर्च मोराणकर परिवाराने केला.
याप्रसंगी श्री महेंद्रभाऊ महालपुरे,श्री बाबुलाल नारायण मोराणकर,श्री संदिप मोराणकर व सामाजिक कार्यकर्ते व जेष्ट पत्रकार श्री अनिलआबा येवले हे उपस्थित होते.

अशा या सुंदर सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.