Home जळगाव समतावादी साहित्य मंडळामार्फत 14 एप्रिल रोजी कवी संमेलन

समतावादी साहित्य मंडळामार्फत 14 एप्रिल रोजी कवी संमेलन

समतावादी साहित्य मंडळामार्फत 14 एप्रिल रोजी कवी संमेलन

समतावादी साहित्य शिक्षक मंडळामार्फत महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती प्रीत्यर्थ जिल्हास्तरीय कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कवी संमेलन सीताबाई गणपत भंगाळे विद्यालय, खोटेनगर, जळगाव या ठिकाणी सकाळी 11:30 वाजता संपन्न होणार आहे. सदर कवी संमेलन संस्थेचे अध्यक्ष तथा साहित्यिक प्रा. भरत शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर अतुल सूर्यवंशी यांच्या हस्ते कवी संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
सहभागी कवींना सन्मानपत्र, ग्रंथ व स्मृतिचिन्ह देऊन गौरविले जाणार आहे. कवी संमेलनामध्ये सहभागी होण्या संदर्भात आवाहन संस्थेचे सचिव एस.ए.पाटील, उपाध्यक्ष डॉक्टर अशोक सैंदाणे, खजिनदार रणजीत सोनवणे यांनी केले आहे.

Don`t copy text!