धस आणि लंघे या दोन आमदारांनी शनैश्वर देवस्थान बोगस ॲप व खोगिरभर्ती प्रकरणाचा विधानसभेत आवाज उठवताच,बाहेरचे पोलिस आणून महाराष्ट्र सायबर एडीजी मार्फत कारवाई करण्याचे फडणवीस यांचे आदेश 

धस आणि लंघे या दोन आमदारांनी शनैश्वर देवस्थान बोगस ॲप व खोगिरभर्ती प्रकरणाचा विधानसभेत आवाज उठवताच,बाहेरचे पोलिस आणून महाराष्ट्र सायबर एडीजी मार्फत कारवाई करण्याचे फडणवीस यांचे आदेश

 

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) जागतिक दर्जाचे देवस्थान म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथील ज्या शनैश्वर देवस्थानचा उल्लेख होतो ते शनैश्वर देवस्थान ट्रस्टच बोगस ॲप आणि बोगस नोकरांची खोगर भरती प्रकरणी चौकशीच्या शनिफेऱ्यात अडकले आहे.आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस आणि नेवाशाचे शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी पावसाळी अधिवेशनात या भ्रष्ट घोटाळ्याचा आवाज उठवताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले की जिल्ह्यातील नव्हे तर बाहेरचे पोलिस आणून महाराष्ट्र सायबर एडीजी मार्फत कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडताना प्रश्न उपस्थित केला होता की शनैश्वर देवस्थान ट्रस्टने बोगस ॲप वापरून प्रती भाविकांकडून १८०० रुपये प्रमाणे रक्कम जमा केली आहे.ती रक्कम खाजगी व्यक्तीच्या खात्यात जमा झाली आहे.बोगस ॲप आणि बनावट पावत्या छापून पुजेच्या नावाखाली शनीभक्तांची लुट करून करोडो रुपयांचा घोटाळा केला आहे.तसेच बोगस नोकरांची खोगीर भरतीही केली आहे. त्या शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तावर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित केला होता.तर आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी शनैश्वर देवस्थान बाबद लक्षवेधी सूचना मांडताना असं नमूद केले होते की देवस्थानाच्या नावे श्रीमंदीर उत्सव ॲप,वामा,शेमारू, घरमंदीर असे वेगवेगळे ॲप आहेत.या ॲपच्या माध्यमातून तीन लाख भक्तांकडून पाचशे कोटी रुपयांपेक्षा जास्त रूपये जमा झाले आहेत.या देवस्थानचे अध्यक्ष,सचिव,विश्वस्त सीओ दरंदले यांच्या नावाने दर दोन तीन महिन्यांला दहा ते वीस कोटी रूपयांची प्राॅपर्टी खरेदी करत आहेत याच्या व्रुत्तपत्रात बातम्या आल्या आहेत.या विरोधात विशाल सुरपुरीया यांनी अगोदरच तक्रार दाखल केली होती.त्यामुळे हे शनिदेव विश्वस्त मंडळ बरखास्त करणार का? आणि सन २०१८ सालचा कायदा शनिशिंगणापूर देवस्थान साठी मंजूर केला आहे त्याची अंमलबजावणी कधी करणार असे प्रश्न विचारले होते.त्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधानसभेत असे सांगितले की मागिल अधिवेशनात २४/९/२०२४ रोजी नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता त्या वेळी देवस्थान साठी चौकशी समिती नेमली होती.त्या समितीच्या चौकशी अहवालात अनेक बाबी उघड झाल्या आहेत.एकूण २४७४कर्मचारी हे बोगस भरती करण्यात आले आहेत. त्या मध्ये देवस्थानच्या रुग्णालयात ३२७ कर्मचारी दाखवण्यात आले आहेत प्रत्यक्षात मात्र एकही नाही.दवाखान्यात पंधरा खाटा दाखवण्यात आल्या आहेत.८० वैद्यकिय,२४७ अकुशल कर्मचारी,४पुजारी, पैकी ९ हजर होते.अस्तीत्वात नसलेल्या बागेसाठी ८० कर्मचारी आणि इतर कामांसाठी ३२७ कर्मचारी दाखवण्यात आले आहेत.देवस्थानच्या १०९ खोल्यासाठी २०० कर्मचारी दाखवले आहेत.पण प्रत्यक्षात आठ ते दहा कर्मचारी दिसले.देणगीसाठी ८, तेल विक्रीसाठी ४, काउंटरवर ८ कर्मचारी प्रत्यक्षात दिसले पण रजिस्टरला मात्र ३५२ कर्मचारी दाखवले आहेत.देवस्थानच्या १३ गाड्यासाठी १६३ कर्मचारी दाखवले आहेत प्रत्यक्षात १३ दिसले आहेत. वृक्षसंवर्धनासाठी ८३ कर्मचारी दाखवले आहेत प्रत्यक्षात मात्र कार्यरत कोणीही नाही.देवस्थानच्या ३५ एकर जमिनीसाठी ६५ कर्मचारी दाखवले आहेत.पाणीपुरवठा विभागात ७९ कर्मचारी दाखवण्यात आले आहेत.गोशाळा विभागात ८२ कर्मचारी दाखवले आहेत.त्यापैकी २६ कर्मचारी हे रात्री १ वाजेपर्यंत कामावर दाखवले आहेत.पार्किंग स्वच्छतेसाठी ११८ कर्मचारी दाखवले आहेत.सुरक्षा विभागात ३१५ कर्मचारी, प्रसादालयासाठी ९७ कर्मचारी दाखवले आहेत.१३ वाहनासाठी १७६ कर्मचारी दाखवले आहेत.विद्युत विभागाच्या एका युनिटसाठी २०० कर्मचारी, असे एकूण २४७४ कर्मचारी कार्यरत आहेत असे दाखवले आहेत.त्यापैकी कोणाचेही मस्टर, हजेरी नाही.काही कार्यकर्त्यांना बॅंकेत खाते उघडण्यास लावली आणि त्या खात्यात दरमहा मंदिराच्या खात्यामधुन पगार दिला जातो.मी अनेक वेळा भेटी दिल्या त्या वेळी फक्त २५८ कर्मचारी कार्यरत होते ते पुरेसे होते.तेव्हा अडचण नव्हती आणि आता २४७४ कर्मचारी नोंदले आहेत.या अहवालावर अंतिम सुनावणी ही चारीटी कमिशनर मार्फत चौकशी सुरू आहे.मागिलवेळी चारीटीच्या एका अधिकाऱ्यांनी चौकशी करून सर्वांना क्लीन चिट दिली होती.त्या अधिकाऱ्यांचीही खातेनिहाय चौकशी करून चुकीचा अहवाल दिला म्हणून त्याच्यावर ही कडक कारवाई करणार आहे.मागिल अधिवेशनात नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा प्रश्न उपस्थित केला आणि चौकशी लावली म्हणून हा प्रकार निदर्शनास आला.या सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात करण्यात येणार आहे.महाराष्ट्र विधानसभेत कायदा पारित करून ज्या प्रकारे शिर्डी आणि पंढरपूर देवस्थान ट्रस्ट प्रमाणे समिती असावी असा निर्णय पुर्वीच केला आहे.त्याची फक्त अंमलबजावणी बाकी आहे.त्याचा ही निर्णय लवकरात लवकर करणार आहोत.त्या आधी या ट्रस्ट मंडळावर कार्यरत असलेल्या भ्रष्ट विश्वस्त मंडळाला त्याची जागा दाखवण्याची गरज आहे. ती कारवाई अगोदर केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधानसभेत दिले. एकंदरीत शनिशिंगणापूरचे शनैश्वर देवस्थान ट्रस्ट हे चौकशीच्या आणि साडेसातीच्या शनिफेऱ्यात अडकले असल्याचे दिसून येत आहे.या वेळी मुख्यमंत्र्यांनी विनोद करताना सांगितले की ईश्वराच्या ठिकाणी चोरी केल्याचा घोटाळा समोर आला आहे.शनिदेवांनी त्यांना प्रताप दाखवला आहे.चेरमनचा जाहीर सत्कार करून त्यांची सर्वांचीच मंदिर येथे बांधावे लागेल असे मिश्कीलपणे सांगितले.आता घोटाळेबाजावर फौजदारी कारवाई कधी होते या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.