“या देवी सर्वभूतेषु नारी रूपें संस्कृता नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः”

“या देवी सर्वभूतेषु नारी रूपें संस्कृता नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः”

8 मार्च रोजी जागतिक महिला दिन असून त्यादिवशी भारतातील प्रत्येक महिलेचा आदर व सन्मान केला जातो भारतातीलच नव्हे तर जगातील महिला या परंपरेनुसार व प्रथेनुसार महिलादिनी अनेक कार्यक्रम घेत असतात महिलाचे अनेक रूप असून त्यात आई बहिण मुलगी असे अनेक रूप असून महिला ही सदैव आपला संसार सांभाळून आपले घर चालवीत असते मुलाबाळांना लहानाचे मोठे करणे आई-वडिलांची सेवा करणे पूर्वीच्या महिला या कमी शिकलेल्या असल्या तरी आपला संसार अत्यंत हुशारीने सांभाळत असत. पुढे कालांतराने देशाची प्रगती होत गेली महिलाही सक्षम होत गेल्या, शिक्षण क्षेत्र असो वा कोणतेही क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपला ठसा उमटविला आहे.. उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर वकील प्राध्यापिका शिक्षिका अशा अनेक क्षेत्रात प्रवेश करून महिला कुठेही कमी पडत नाही हे सिद्ध करून दाखवले राजकारणातही महिला आघाडीवर असून राष्ट्रपती सुद्धा भारताच्या महिला होत्या तसेच आमदार खासदार मंत्री अशा विविध राजकारणात संधी घेऊन त्यांनी नाव लौकिक केले उत्तम प्रकारचे क्रीडा क्षेत्रात कबड्डी खोखो क्रिकेट या क्षेत्रातही महिलांची आघाडी असून महिला या सर्वांना समान न्याय देत असतात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असतात काही महिला नोकरी करून आपला संसार सांभाळत असतात शासनाने महिला सक्षमीकरणासाठी व गृह उद्योगाला चालना देण्यासाठी महिला बचत गट स्थापन करून महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला महिलांनी बचत गटामार्फत अनेक घरगुती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करीत असतात .. भारतात उत्तम प्रकारच्या गायिका स्वर्गीय लता मंगेशकर आशा भोसले अनुराधा पौडवाल अनेक गायिका महिला झाले असून वरिष्ठ पदावर ही अनेक महिला असून उत्तम प्रकारे काम करतात महिला या नवरात्र उत्सव मध्ये दांडिया रास कार्यक्रमात भाग घेऊन नवरात्र ची शोभा वाढवता विविध शाळेत शिक्षिका असलेल्या महिलावर्ग अनेक चांगले कार्यक्रम घेऊन विद्यार्थिनींना घडवीत असतात … असे असले तरी हा सन्मान फक्त महीला दीनिच का कायम स्री कडे सन्मानाने का बघितले जात नाही.. स्री समानता हि फक्तं कागदावरच असते त्यामूळे ज्या दिवशी खरंच स्री विषयी सन्मान हा फक्तं देखाव्यासाठी नव्हे तर मनापासुन वाटेल तेव्हा प्रत्येक दिवस हा महिलांसाठी महीला महीला दिवसच असेल….. मग 8 मार्च हा वेगळा साजरा करण्याची गरज राहणार नाही 🙏🙏🙏🙏
*शब्दांकन सौ. ललिता पाटील.. महाराष्ट्र राज्य महीला सुरक्षा जळगाव जिल्हा अध्यक्षा… महीला सुरक्षा पथक पाचोरा तालुका अध्यक्षा.*