ज्येष्ठ पत्रकार कै. नामदेवराव भोसले यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेकडून पन्नास हजाराचे अर्थसहाय्य केले : जेष्ठ संपादक संजयजी भोकरे यांनी भोसले यांच्या कुटुंबियांच केलं सांत्वन

ज्येष्ठ पत्रकार कै. नामदेवराव भोसले यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेकडून पन्नास हजाराचे अर्थसहाय्य केले : जेष्ठ संपादक संजयजी भोकरे यांनी भोसले यांच्या कुटुंबियांच केलं सांत्वन :
———————————————————————
ज्येष्ठ पत्रकार कै.नामदेवराव भोसले यांच्या कुटुंबायांची भेट घेऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे राज्य संघटक आणि जेष्ठ संपादक संजयजी भोकरे यांनी नामदेव भोसले यांचे बंधू उद्धव भोसले आणि भोसले यांच्या कुटुंबियांच सांत्वन केले. यावेळी कै. नामदेवराव भोसले यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटने कडून आज पन्नास हजाराचे अर्थसहाय्य करण्यात आले. तसेच एस बी जी आय शिक्षण संस्थेच्या जरण्यालिझम विभागा मार्फत आणखीन पन्नास हजाराचे अर्थसहाय्य करणार असल्याचे यावेळी जेष्ठ संपादक संजयजी भोकरे यांनी जाहीर केले.
यावेळी सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हा संघटक प्रकाश कांबळे, जेष्ठ पत्रकार दिगंबर शिंदे, सदानंद औन्ध्ये, वृत्तवाहिनी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र कांबळे, वृत्तवाहिनी पत्रकार संघटनेचे मिरज तालुका अध्यक्ष अर्जुन यादव, वृत्तवाहिनी पत्रकार संघटनेचे मिरज शहर अध्यक्ष गणेश आवळे, मिरज शहर पत्रकार संघटनेचे सचिव शरद सातपुते आणि संकेतराज बन्ने उपस्थित होते.