पाचोरा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे वाघूलखेडा येथे उद्घाटन

पाचोरा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे वाघूलखेडा येथे उद्घाटन

पाचोरा दि. 07 – पाचोरा येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे दि. 07 मार्च 2022, सोमवार रोजी वाघूलखेडा येथील भारतीय सैन्य दलातील माजी सैनिक श्री. दामू दगडू पवार यांच्या शुभहस्ते जिल्हा परिषद शाळा, वाघूखेडा येथे उद्घाटन झाले. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे चेअरमन मा. श्री. नानासाहेब सुरेश रुपचंद देवरे हे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. वाय. बी. पुरी यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराची भूमिका स्पष्ट केली. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा विद्यार्थी विकास विभाग अधिकारी मा. प्रो. डॉ. जे. व्ही. पाटील यांनी विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे याच श्रमसंस्कार शिबिरातून मिळतील. त्यासाठी या श्रमसंस्कार शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे सर्व जीवन मूल्ये स्वीकारले पाहिजेत असे सांगितले. तर महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रो. डॉ. वासुदेव वले यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकासाचा मार्ग स्वीकारला पाहिजे, तो मार्ग स्वीकारण्यासाठी विद्यार्थ्यांनी या श्रमसंस्कार शिबिरातून गांधीजींची *’थ्री एच’* संकल्पना अंगीकारली पाहिजे तेव्हाच खऱ्या अर्थाने कर्तृत्व संपन्न भारतीय युवक घडू शकतो असे प्रतिपादन केले. याप्रसंगी वाघूलखेड्याचे उपसरपंच श्री. रवींद्र ठाकरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. संजू एम. पाटील, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजय बाविस्कर, श्री. साहेबराव पाटील, श्री. मुकुंदा पाटील, श्री. संदीप पाटील, श्री. फकिरा पाटील, श्री. शंकर पाटील, श्री. संजय पाटील, श्री. किशोर पाटील, श्री. गणेश पाटील, श्री. अमृत गायकवाड, श्री. रवींद्र ठाकरे, प्रा. अर्चना टेमकर, प्रा. प्रियंका जाधव व गावकरी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. पी. एम. डोंगरे, प्रा. आर. बी. वळवी, प्रा. उज्वल पाटील, प्रा. गिरीशचंद्र पाटील, प्रा. माणिक पाटील, प्रा. अधिकराव पाटील, प्रा. स्वप्नील भोसले, प्रा. नितीन पाटील, प्रा. गणेश देशमुख, श्री. विजय सोनजे, श्री. जावेद देशमुख व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. के. एस. इंगळे तर आभार प्रदर्शन डॉ. एस. बी. तडवी यांनी केले.