अडीच वर्षे होऊन देखील शेतकऱ्यांना येणाऱ्या विजेच्या समस्या सुटत नसतील तर आमदार महोदय राजीनामा द्या भाजपाच्या अमोल शिंदें यांचा घणाघात

अडीच वर्षे होऊन देखील शेतकऱ्यांना येणाऱ्या विजेच्या समस्या सुटत नसतील तर आमदार महोदय राजीनामा द्या

——————————————————–
भाजपाच्या अमोल शिंदें यांचा घणाघात
——————————————————–

पाचोरा-

शेतकऱ्यांना रब्बी हंगामात सुरू असताना पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा अनियमित पद्धतीने व कमी दाबाने होणारा वीज पुरवठा सुरळीत करून दिवसा किमान ०८ तास वीज पुरवठा करण्यात यावा यासाठी भारतीय जनता पार्टी पाचोरा-भडगावच्या वतीने महावितरणच्या उपविभागीय कार्यकारी अभियंता,पाचोरा भाग,पाचोरा यांना निवेदन देण्यात आले.यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना अमोल शिंदे यांनी सांगितले की,पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकरी महावीतरणाकडुन वारंवार येणाऱ्या वीज समस्यांमुळे मोठ्या संकटात सापडले असून तालुक्याचे आमदार किशोर पाटील हे ह्या समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करित आहेत.दुसऱ्यांदा आमदार होऊन त्यांना अडीच वर्षे झालीत परंतु ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर ते आमदार झालेत,त्यांना त्याच शेतकऱ्यांच्या समस्यांशी काही घेणेदेणे नाही.आणि त्यांच्या कडून जर ह्या समस्या सुटत नसतील तर आमदार महोदय तात्काळ राजीनामा द्या.असा घणाघात करत अमोल शिंदे म्हणाले कि शेतकरी बांधवांना कृषीपंपांचा होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवाकडून प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनीद्वारे तक्रारी प्राप्त होत आहेत. या बाबत मी प्रत्यक्ष गाव भेटीवेळी शेतकऱ्यांसोबत करीत असलेल्या चर्चांवर असे निदर्शनास येत आहे की कृषी पंपांना वीजपुरवठा करते वेळी कमी दाबाने व अनियमितपणे वीज पुरवठा होत आहे. याबाबतची माहिती घेतली असता काही ठिकाणी सब स्टेशनला कॅपॅसिटर नसल्याने कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे (म्हणजेच शेतकऱ्यांना वीज उपलब्ध असून देखील पाण्याचे संच सुरू होण्यास अडचणी येत आहेत) तसेच शेतकऱ्यांना किमान आठ तास अखंडित वीज उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त असून देखील बहुतांश गावांमध्ये रोज पाच ते सहा तास वीज उपलब्ध होत आहे.
तसेच या वर्षी सर्व ठिकाणी पाणी मुबलक असून ऐन रब्बी हंगामात कृषीपंपांचा वीज पुरवठ्यात खुप मोठ्या प्रमाणात अनियमितता निदर्शनास येत असुन वीज पुरवठयाचा दाब कमी-जास्त प्रमाणात झाल्याने विद्युत कृषीपंपांसह,ट्रांसफार्मर जळणे व त्यानंतर महावितरणाकडून ट्रांसफार्मर बदलून व दुरुस्त करून मिळण्यासाठी पुन्हा वीज बिल वसुलीचा तगादा लावणे इ.समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.रब्बी हंगामाची पिके परिपक्व होण्याच्या शेवटच्या टप्यात असून त्यांना पाण्याची आवश्यकता असतांना अशा प्रकारे शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.विहीरीत पाणी असून देखील महावितरणाकडून होणाऱ्या त्रासामुळे ते पिकांना देता येत नाही.तरी तात्काळ संबंधित विभागांतील अभियंत्यांना सूचना देऊन वरील समस्या मार्गी लावून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.अशा आग्रही मागणीचे निवेदन भाजपा पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस तथा जि.प.सदस्य मधुकर काटे,भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष कांतीलाल जैन,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेखा पाटील,विधानसभा क्षेत्र प्रमुख हिम्मतसिंग निकुंभ,पं.स. सभापती वसंत गायकवाड,पं.स. मा. सभापती व सदस्य बन्सीलाल पाटील,पं.स.सदस्य ज्ञानेश्वर सोनार,सरचिटणीस गोविंद शेलार,नगरसेवक विष्णू अहिरे, भाजयुमो तालुकाध्यक्ष मुकेश पाटील,शहराध्यक्ष समाधान मुळे, वीरेंद्र चौधरी,योगेश ठाकूर,प्रशांत सोनवणे,मच्छिंद्र पाटील,अमोल नाथ यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.