महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

जळगाव, दि. 13 : महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी तहसीलदार (सर्वसाधारण) सुरेश थोरात, आर. एस. पाटील, प्रकाश शेळके यांच्यासह विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.