वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जामनेर तालुका समन्वयक म्हणून प्रा.ईश्वर चोरडिया यांची नियुक्ती

वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जामनेर तालुका समन्वयक म्हणून प्रा.ईश्वर चोरडिया यांची नियुक्ती

जामनेर (प्रतिनिधी)

वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जामनेर तालुका समन्वयक म्हणून नुकतीच प्रा. ईश्वर चोरडिया यांची तर शेंदुर्णी शहर समन्वयक म्हणून सोनू नेरपागरे यांची नियुक्ती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब, खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मदत कक्ष प्रमुख महाराष्ट्र राज्य मंगेश चिवटे यांच्या आदेशाने करण्यात आली आहे.

जळगाव येथील सारा हॉस्पिटल येथे झालेल्या कार्यक्रमात जळगाव महापौर जयश्री महाजन, नगरसेवक गणेश सोनवणे, नगरसेवक इबा पटेल, युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजित पाटील,वैद्यकीय मदत कक्ष जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख जितेंद्र गवळी, जळगाव जिल्हा समन्वयक डॉ मोईज देशपांडे यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले.

प्रा. ईश्वर चोरडिया व सोनू नेरपागारे यांच्या नियुक्तीचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील, रावेर लोकसभा सह संपर्क प्रमुख माजी आ चंद्रकांत सोनवणे, शिवसेना जिल्हाप्रमुख आ चंद्रकांत भाऊ पाटील, शिवसेना जळगाव उपजिल्हाप्रमुख डॉ मनोहर पाटील, युवासेना सहसचिव महाराष्ट्र राज्य विराज कावडिया, युवासेना जिल्हाप्रमुख शिवराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, जामनेर विधानसभा क्षेत्र प्रमुख नीलकंठ पाटील, जामनेर उपतालुका संघटक सुधाकर सराफ, जामनेर शहर प्रमुख अतुल सोनवणे, ज्ञानेश्वर जंजाळ, फत्तेपूर गण प्रमुख तुकाराम गोपाळ, युवासेना माजी उपजिल्हाप्रमुख ॲड भरत पवार, जामनेर उपतालुकाप्रमुख कृष्णा चोरमारे, जामनेर तालुका शिवसेना प्रसिध्दी प्रमुख तथा पत्रकार गणेश पांढरे, युवासेना तालुका प्रमुख विशाल लामखेडे, युवासेना तालुका कार्यकारिणी सदस्य मयूर पाटील, जामनेर तालुका शिवसेना उपप्रमुख डॉ सुनील अग्रवाल, शेंदुर्णी शहर प्रमुख भैय्या गुजर, शेंदुर्णी युवासेना शहर प्रमुख अजय भोई, युवासेना शाखाप्रमुख पाळधी नीलू आबा, जामनेर तालुका प्रसिध्दी प्रमुख मुकेश जाधव, कार्तिक काळे, सचिन शहाणे, जामनेर तालुका रोजगार हमी समिती सदस्य अरुण सावकारे यांनी हार्दिक अभिनंदन करीत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.