खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या दणक्याने हजारो ग्रामस्थांची अडचणीतून सुटका

खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या दणक्याने हजारो ग्रामस्थांची अडचणीतून सुटका

श्रेय वादासाठी स्थानिक राजकारणाचा छुपा विरोध चव्हाट्यावर
नाट्यमय घडामोडीनंतर अखेर पाळधी रेल्वे गेट उघडले
——————-
पाळधी ता.जि.धरणगाव -येथील रेल्वे गेट क्रमांक 153 कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश रेल्वेने दिल्यामुळे या परिसरातील 25 हजार नागरिकांना पर्यायी रस्ता नव्हता जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत 153 क्रमांक गेट बंद करण्यात येऊ नये. अशी विनंती खासदार उन्मेश दादा पाटील यांना परिसरातील रहिवाश्यांनी केली होती. *या अनुषंगाने 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी प्रत्यक्ष घटनास्थळावर जावून स्थानिक ग्रामस्थांचे व परिसरातील नागरिकांचे म्हणणे खासदार उन्मेश दादा पाटील यांनी ऐकून घेतले होते. आणि पश्चिम रेल्वेचे डीआरएम यांना पत्र पाठवून तसेच डि.सी.एम.मुलचंदानी यांना भ्रमणध्वनीद्वारा रेल्वे गेट बंद करु नका असे आदेशीत केले होते*. मात्र याचे श्रेय खासदार उन्मेश दादा पाटील यांना मिळू नये. *यासाठी स्थानिक राजकारणी यांनी “पुण्य खर्चून”दुसऱ्या दिवशी रेल्वे गेट बंद करण्यासाठी छुपा प्रयत्न केला*
त्यामुळे संबंधीत रेल्वेगेट बंद करण्यासाठी रस्ता खोदून वाहतुक बंद करण्यात आली होती. *आज अखेर खासदार उन्मेश दादा पाटील यांनी थेट दिल्ली अधिवेशनातून रेल्वे प्रशासनास परिसरातील नागरिकांशी बैठक घेऊन आधी चर्चा करा असा सज्जड दम भरला*.त्यामुळे खोदलेला रस्ता बुजून पुन्हा रेल्वे गेटमधून वाहतूक सुरळीत करण्यात आल्याने खासदार उन्मेश दादा यांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
*पंचवीस हजार नागरिकांची गैरसोय टळली*
या रेल्वे गेटमुळे रेल, लाडली, चांदसर, कवठळ, चोरगाव, धार, शेरी, पथराड, झुरखेडा, निमखेडा, अंजनविहीरे, खामखेडे, दहिदुले, वाकटुकी,निंभोरा, सोनवद,हनुमंतखेडा,अहिरे, खरदे, खमनवाडी, चमगाव ,बाभूळगाव, पश्टाणे, तरडे, गंगापूरी, बोरखेडा, वंजारीखपाट या परिसरातून विद्यार्थी, नोकरदार, ग्रामस्थ सुमारे 25 हजार नागरिकांची गैरसोय होणार होती. *गेट बंद साठी रस्ता खोदण्याचे काम सुरू झाल्याने आज भाजपचे तालुका उपाध्यक्ष किशोर झंवर आणि राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष असलेले स्थानीक रहिवाशी अरविंद मानकरी यांनी ही बाब खासदार उन्मेश दादा पाटील* यांच्या कानावर घातली.
*खासदार उन्मेश दादा पाटील यांनी खंबीर भूमिका घेतली*. तातडीनं आपल्या अधिकाऱ्यांना तेथे भेट देवून वस्तुस्थिती जाणून याबाबत भेटीची तारीख कळवावी. मी प्रत्यक्ष त्या प्रसंगी उपस्थीत राहीन. तोपर्यंत सदरचे 153 रेल्वे गेट बंद करण्यात येऊ नये. तातडीने रेल्वे गेट बंद करण्याचे आदेश मागे घेण्यात यावे. तसा अहवाल माझ्या कार्यालयास पाठवण्यात यावा. असे पत्र पाठवून रेल्वे विभागास धारेवर धरले होते. मात्र आज संसदेच्या अधिवेशनात व्यस्त असून देखील खासदार उन्मेश दादा पाटील यांनी खंबीर भूमिका घेत रेल्वे गेट सूरू ठेवण्यास भाग पाडले.
————–
*सत्य परेशान होता है पराजित नही*
*नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत*
रेल्वे गेट हा विषय केन्द्रीय अखत्यारीतील असल्याने खासदार श्री. उन्मेष दादा पाटील यांच्याशी संपर्क साधण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिकांनी माझ्याशी संपर्क साधला. हा विषय माझ्या गावाचा आणि परिसराचा असल्याने याबाबत खासदार उन्मेश दादा पाटील यांना माहिती दिली. मात्र स्थानिक विरोधकांना याचे श्रेय खासदार उन्मेष दादा पाटील यांना मिळू नये यासाठी सामान्य नागरिकांना वेठीस धरून प्रतिष्ठेचा करून पदाचा दुरूपयोग करून गेट बंद केले होते. मात्र *सत्य परेशान होता है पराजित नही*. शेवटी न्याय मिळतोच. तरी हा विजय सर्वसामान्य जनतेचा आहे. आम्ही फक्त निमित्तमात्र आहोत. ही श्रेय वादाची लढाई नाही.*युवा खासदार उन्मेश दादा यांनी आमच्या परिसरातील नागरिकांसाठी प्रामाणिक प्रयत्न केले. मात्र याचे भान छुपा विरोध करणारे विसरलेत अशी जळजळीत प्रतिक्रिया किशोर झंवर, (तालुका उपाध्यक्ष भाजपा धरणगांव, तथा जि. प. गट प्रमुख पाळधी बांभोरी प्र. चा., चांदसर) यांनी* प्रसारमाध्यमांना दिली आहे*.
——————–
*नाट्यमय घडामोडी नंतर अखेर पाळधी रेल्वे गेट पुन्हा उघडलं*
*राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी यांची प्रतिक्रीया*

खासदार उन्मेष दादा पाटील यांच्या प्रयत्नाने आम्ही परिसरातील ग्रामस्थांच्या मागणीला यश आले असून खासदार उन्मेश दादा पाटील यांना भेटून माझ्या घराजवळ असलेले रेल्वे गेट नं. 153 हे कायमस्वरूपी बंद करण्याचा घाट घातला जात आहे. याची कल्पना खासदार उन्मेश दादा यांना दिली. त्यांनी दिल्ली अधिवेशनात व्यस्त असून देखील ठोस भुमिका घेतली याबद्दल त्याचे आभार मानतो अशी भावना *राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी* यांनी व्यक्त केली आहे.
————

*स्थानीक सत्ताधारी राजकारणी पडले तोंडावर*

स्थानिक नागरिक तसेच परिसरातील 20 गावांचे विद्यार्थी, नोकरदार, ग्रामस्थ व सर्वपक्षीय पदाधिकारी/ कार्यकर्त्यांनी ही समस्या खासदारांच्या निदर्शनास आणून दिली. याची त्वरित दखल खासदार उन्मेशदादा यांनी घेऊन ५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी तातडीने सदर स्थळी भेट दिली. नागरीकांच्या समस्या जाणून घेत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून रात्री ८ वाजता संपर्क साधून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता सदर गेट नं. १५३ बंद करू नका असे तोंडी आदेश दिले. सदर कामाचे श्रेय खासदार उन्मेशदादा पाटील आणि भाजपा यांना होत असल्याने स्थानिक राजकीय विरोधकांनी सामान्य नागरिकांना वेठीस धरून गेट नं. १५३ काही तांत्रिक मुद्यांवर बोट ठेवून रेल्वे गेट ७ फेब्रुवारी ला दुपारी बंद केले होते. तसेच जे. सी. बी. च्या साहाय्याने रस्ता खोदला होता व खासदाराचे कोणी ऐकत नाही अशी अफवा देखील पसरवण्यात आली. मात्र खासदारांनी दिलेल्या आदेशाचे पोटशूळ स्थानीक एका बड्या नेत्याला झाल्यामुळे गेट बंद करण्यात आल्याची पाळधी नागरिकांमध्ये चर्चा होती. याबाबतीत काही लोकांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना गेट बंद करण्याबाबत विचारले असता त्या स्थानीक नेत्याच्या सांगण्यावरून गेट बंद केल्याची माहिती दिली. यामुळे परिसरातील लोकांमध्ये भयंकर रोष होता. याबाबत खासदार उन्मेशदादा पाटील यांनी सतत भाजपा धरणगांव तालुका उपाध्यक्ष किशोर झंवर यांच्याशी संपर्क करत दिल्लीच्या संसदीय अधिवेशनात असूनसुद्धा लक्ष ठेवून होते. सोमवारी दुपारी गेट बंद झाल्यानंतर खासदार उन्मेशदादा पाटील यांनी रेल्वे मंत्री नामदार अश्विनी वैष्णव तसेच रेल्वे राज्यमंत्री नामदार रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. रेल्वे मंत्र्यांना सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल जाणीव करुन दिली असता नागरिकांचे हाल होऊ नये म्हणून आज तातडीने गेट नं. १५३ अखेर पुन्हा उघडण्यात आले. सदर गेटवर माती टाकून जेसीबी ने तयार झालेले गड्डे बुजविण्याचे काम सुरू होताच नागरिकांनी आनंद व्यक्त करत खासदार उन्मेशदादा पाटील यांचे सोशल मीडियावर आभार मानले आहेत.