पाचोरा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे डॉ. शिवाजी शिंदे यांचा सत्कार

पाचोरा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे डॉ. शिवाजी शिंदे यांचा सत्कार

 

पाचोरा : येथील सा. ग्लोबल महाराष्ट्र चे संपादक तथा लेखक व कवी प्रा. डॉ. शिवाजी शिंदे यांनी निसर्गोपचार शास्त्रातील ॲक्युपंक्चर विषयात पी. एचडी. संपादन केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. काल दिनांक 20 सप्टेंबर रोजी माध्यमिक कन्या विद्यालय पाचोरा येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अध्यक्ष किशोर रायसाकडा, ज्येष्ठ पत्रकार अनिल येवले (दक्ष पोलीस टाइम्स प्रतिनिधी), यांनी शाल, सनमानाचिन्ह, पुष्पगुच्छ यासोबतच ट्रॅक सूट, व घड्याळ देऊन त्यांना सन्मानित केले. याप्रसंगी माणिक राजे पवार विश्वासराव ट्रस्टचे विश्वस्त प्रा रवींद्र चव्हाण, प्राथमिक विद्या मंदिराचे मुख्याध्यापक पंडित कुंभार, वरिष्ठ लिपिक शिवाजी बागुल, धनराज धनगर, प्रा.प्रतिभा परदेशी, प्रा. अंकिता देशमुख, प्रा. संगीता राजपूत, प्रा. प्रतिभा पाटील, व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.