अण्णासाहेब देशमुख फाउंडेशन व मेडिलिव्ह हॉस्पिटल नाशिक तर्फे पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथेरविवार दिनांक 3 सप्टेंबरला मोफत महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे

अण्णासाहेब देशमुख फाउंडेशन व मेडिलिव्ह हॉस्पिटल नाशिक तर्फे
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथेरविवार दिनांक
3 सप्टेंबरला मोफत महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे

 

पाचोरा ( प्रतिनिधी )
पाचोरा तालुक्यातील कु-हाड खुर्द येथील ,अण्णासाहेब देशमुख फाऊंडेशन व डाॅ.शरद देशमुख यांचे मेडिलिव्ह मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल( द्वारका,नाशिक) यांच्या संयुक्त विद्यमाने कुऱ्हाड खुर्द येथे आदर्श माध्यमिक विद्यालय येथे रविवार 3 सप्टेंबरला महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे याची माहिती पोट व यकृत विकार तज्ञ डाॅ.शरद देशमुख आणि स्त्रीरोग तज्ञ डाॅ. सुचिता देशमुख यांनी दिली.
या शिबिरात अनेक तज्ञ डॉक्टर्स -डॉ.अनुज नेहेते (मेंदू विकार), डॉ. स्वप्नील विधाते (नेत्ररोग व मोतीबिंदू),डॉ. राहुल गहिलोद (अस्थिरोग), डॉ. पार्थ देवगावकर (किडनी विकार ),डॉ. दिपीका मुंदडा (एम.डी.), डाॅ.अंकुर झंवर ( हृदयरोग), डाॅ.विजय जाधव ( बालरोग), डॉ.निखिल पाटील (एम. डी), डॉ प्रविण पाटील (md);डॉ नीलेश पवार (बालरोग), डॉ. शरद देशमुख (पोटविकार व यकृत),डाॅ.सुरज चौधरी (संधिवात),डॉ. महेंद्र बोरसे ,(बालरोग),डॉ. सुचिता देशमुख (स्त्रीरोग तज्ञ), डॉ मुकेश चौधरी (कॅन्सर तज्ञ ), डॉ सिद्धांत तेली (एम डी), डॉ.शीतल सावनेरकर (त्वचारोग),डॉ. ज्योत्स्ना पाटील (दंतरोग), रेवती पुजारी (आहार तज्ञ ) रुग्णांची विनामूल्य तपासणी करणार आहेत. ईसीजी,बीएमडी,लिव्हर फायब्रोस्कॅन,बीएमआय ,ब्लड प्रेशर,डायबेटीक न्यूरोपॅथी स्क्रीनिंग,शुगर ,लिव्हर फंक्शन टेस्ट,युरिक ॲसिड,हिपॅटायटिस बी व सी तपासणी , हिमोग्लोबीन आदी तपासण्याही मोफत करण्यात येणार आहे.
गरजू रुग्णांनी नांव नोंदणीसाठी
८०८०८८३०७४ /९८८१४१४१३९
किंवा ०२५३-२५०६५९९ या नंबर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शिबिरास कु-हाड ग्रामपंचायत, विकास सोसायटी व आदर्श हायस्कूल, स्थानिक डॉक्टर्स , कृष्णा लॅब तसेच कुऱ्हाड ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभणार आहे.

कुणीही गोरगरीब गरजू रुग्ण वैद्यकीय सेवेपासून वंचित राहू नये व रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.अत्यंत महागड्या चाचण्याही यावेळी मोफत करण्यात येणार असल्याने रुग्णांसाठी ही सुवर्णसंधी असून त्याचा अवश्य लाभ घ्यावा,असे आवाहन पोट व लिव्हर तज्ञ डॉ. शरद देशमुख यांनी केले आहे.