शिक्षण विभागात वरीष्ठ वेतनश्रेणी निश्चितीची पडताळणी करून सेवा पटलावर सही करण्यासाठी सहा हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

शिक्षण विभागात वरीष्ठ वेतनश्रेणी निश्चितीची पडताळणी करून सेवा पटलावर सही करण्यासाठी सहा हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

लाच लुचपत प्रतिबंधक विभाग घटक छत्रपती संभाजीनगर सरकार तर्फे फिर्याद = श्री. राजू बी. नांगलोत, पद पोलिस निरीक्षक,छत्रपती संभाजीनगर *आरोपी* लोकसेवक

श्री. पांडुरंग बेलेकर (वय 47 वर्ष) रा. निरामय हॉस्पिटल समोर निसर्ग कॉलनी, तारांगण जालना, व्यवसाय :- नोकरी,पद – लेखा अधिकारी (शिक्षण) जालना (वर्ग -2)

*तक्रारीचे स्वरूप* = यातील तक्रारदार यांनी शिक्षक पदवीधर श्रेणीमध्ये बारा वर्ष पूर्ण केल्यामुळे वरिष्ठ वेतन श्रेणी प्रमाणपत्र मिळवले आहे. त्यानंतर वरिष्ठ वेतन श्रेणीतील वेतन निश्चिती पडताळणी करणेबाबत सेवापट व इतर आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव लेखा अधिकारी (शिक्षण),पांडुरंग बेलेकर यांच्याकडे सादर केला होता. प्रस्तावाच्या चौकशीसाठी तक्रारदार यांनी पांडुरंग बेलेकर यांची दिनांक 01/10/2025 रोजी कार्यालयात भेट घेऊन त्यांना प्रस्तावाची वेतन निश्चिती पडताळणी करण्यासाठी विनंती केली असता श्री पांडुरंग बेलेकर यांनी वरिष्ठ वेतन श्रेणीच्या वेतन निश्चितीची पडताळणी करून सेवा पटावर सही करण्यासाठी सहा हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदारास लाच रक्कम द्यायची इच्छाच नसल्याने आणि हा सारा बोगस कारभार असल्याने त्यांनी थेट लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांचे दरवाजे ठोठावले आणि तक्रार नोंदवली होती.

तक्रारीची पडताळणी = तक्रारदार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक 07/10/2025 रोजी पंचासमक्ष लाच मागणीची पडताळणी केली असता आलोसे यांनी तक्रारदार यांना वरिष्ठ वेतन श्रेणीतील वेतन निश्चिती पडताळणी करून सेवापटावर सही करण्यासाठी 6000 रुपये लाचेची मागणी करून लाच स्वीकारण्याचे मान्य केले होते.

*सापळा कारवाई*

आलोसे यांनी लाच मागणी केल्यानंतर दिनांक 08/10/2025 रोजी पंचासमक्ष सापळा कारवाई आजमावली असता,आरोपी लोकसेवक पांडुरंग बेलेकर आलोसे यांना तक्रारदार यांचा दाट संशय आल्याने त्यांनी लाच रक्कम स्वीकारली नाही.

*घटनास्थळ*

मा.जिल्हाधिकारी कार्यालय जालना, आलोसे पांडुरंग बेलेकर यांचा कक्ष जि. जालना

*आलोसे यांच्या अंगझडती मध्ये एक आयफोन, घराचे कपाटाच्या चाव्या,मोटार सायकलची चावी 3600 रुपये नगद रक्कम मिळून आली असून मोबाईल विश्लेषण करीत आहोत.

आलोसे यांची घरझडती घेतली.

*इतर माहिती*

आज दिनांक 09/12/2025 रोजी आलोसे यांना ताब्यात घेवुन त्यांच्या विरूध्द पोलीस स्टेशन तालुका जि.जालना येथे गुन्हा दाखल केला आहे.

आलोसे यांचे सक्षम अधिकारी मा. संचालनालय लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य मुंबई

*सापळा अधिकारी* श्री.राजू भाऊलाल नांगलोत, श्री.धर्मराज बांगर

पोलीस निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर मो.नं. 7720872555

तपास अधिकारी: श्री बाळासाहेब शिंदे पोलीस उप_ अधीक्षक ला. प्र. वि. छत्रपती मो.9923338565 संभाजी नगर

*मार्गदर्शक* :- श्रीमती,माधुरी केदार कांगणे मॅडम,पोलीस अधीक्षक,ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर. मोबा. 9011092777

श्री. शशिकांत सिंगारे,अप्पर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर. मोबा. 9923102205

श्री. सुरेश नाईकनवरे,

पो. उप अधिक्षक

ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर

मो.न. 9923247986

*सापळा पथक* पो.हे.काॅं.साईनाथ तोडकर,भीमराज जिवडे,पो.अ. युवराज हिवाळे, रामेश्वर ताठे

ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर

जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांच्याकडे कोणताही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.

*भ्रष्टाचारा संबंधित काही तक्रार असल्यास*

*टोल फ्री क्र:- 1064

*व्हॉट्सॲप क्र 7720891064

*पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर 9011092777 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक करीत आहेत.