पाचोरा- येथील श्री.गो.से. हायस्कूल माजी विद्यार्थिनी वैष्णवी मनीष काबरा यांनी सी.ए. परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कार

वैष्णवी काबरा सन्मानित
पाचोरा- येथील श्री.गो.से. हायस्कूलमध्ये सी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल शाळेची माजी विद्यार्थिनी वैष्णवी मनीष काबरा हिला संस्थेचे व्हाइस चेअरमन व्ही.टी.जोशी यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी व्ही.टी. जोशी यांनी वैष्णवी हिला सन्मानित करताना शाळेतील इतर विद्यार्थ्यांनी देखील तिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून उत्तम यश संपादन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. वैष्णवी ताबरा यांचे वडील मनीष काबरा आणि आई वैशाली काबरा यांचा देखील सन्मान करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक सुधीर पाटील,उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक एन.आर.पाटील, आर. एल. पाटील, ए. बी.अहिरे, तांत्रिक विभाग प्रमुख शरद पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनिष बाविस्कर, सांस्कृतिक विभाग प्रमुख आर.बी.तडवी, कार्यालयीन अधीक्षक अजय सिनकर यांचे सह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.संस्थेचे अध्यक्ष मा. आमदार भाऊसाहेब दिलीप वाघ, चेअरमन नानासाहेब संजय वाघ, शालेय समितीचे चेअरमन खालील देशमुख तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन यांनी देखील वैष्णवी काबरा हिचे अभिनंदन केले आहे.