महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यु

महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यु

सुस्वभावि मनोजच्या मृत्युने परिसरात हळहळ
पाचोरा – आज सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान भडगाव आयटीआय जवळ भरधाव ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मनोज अजबसिंग पाटिल वय १७ वर्षे रा. नाचनखेडा येथील(हमु. जयकिसान काॕलनी) याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याच्या सोबत असलेला दुचाकीस्वार गंभीर देखील जखमी झाला आहे.मनोज भडगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा विद्यार्थी होता.सकाळी पाचोरा येथून आयटीआयला जात असतांना ही घटना घडली.नाचनखेडा येथील शेतकरी कुंटूंबातील मनोज शिक्षणासाठी पाचो-याला काकांकडे रहात होता शिवाय फावल्या वेळेत काॕलेज चौकातील पुर्ति शाॕपजवळ दुध विक्रीचे काम करायचा.अतिशय मनमिळावू व सुस्वभावि मनोज कुटूंब आणि मित्र वर्गात अतिशय प्रिय होता.त्याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.विकासाच्या नावाने सुरू असलेले धोकादायक रस्ते मृत्यूचा साफळा बनल्याने नागरिक संताप व्यक्त करित असून या बेलगाम वाहतूकीमुळे सुरू असलेले अपघाताचे सत्र केव्हा थांबणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.