पाचोरा पालिका प्रशासक मुख्यालयी थांबून समस्या सोडवणार का ?

पाचोरा पालिका प्रशासक मुख्यालयी थांबून समस्या सोडवणार का ?
माजी उपनगराध्यक्ष संजयनाना वाघ यांचेसह राष्टूवादी नगरसेवकांचा सवाल

पाचोरा – पाचोरा नगरपालीकेत लोकनियुक्त प्रतिनीधी राजवट समाप्त झाल्याने सध्या प्रशासकीय अधिकारीकारी म्हणुन पाचोरा न पा मुख्याधिकारी शोभाताई बाविस्कर यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे पर्यायाने तेव्हा पासुन पाचोरा न पा प्रशासनाचे कामकाज एकतर्फी व मनमानी पद्धतीने सुरु आहे महत्वाचे म्हणजे एवढया महत्वपुर्णपद असतांना पालिकेच्या प्रशासक & मुख्याधिकारी शोभाताई बाविस्कर या कागदोपत्री पाचोरा निवासी दाखवत असल्यातरी मुळात ते मुख्यालयी थांबत नसल्याने शोभाताई बाविस्कर आज जळगाव येथुन नगर पालीकेत येतील की नाही आल्यातर वेळेवर येतील – जातील की नाही हा यक्ष प्रश्न असतो आणि आल्यातरी नागरीकांना भेटतील की नाही याची शंकाच असते
नागरीकांच्या मुलभूत प्रश्नांसंदर्भात माजी उपनगराध्यक्ष संजयनाना वाघ यांचे सह नगरसेवकांनी जनतेच्या मुलभूत सुविधा संदर्भात स्पष्ट केले की, पाचोरा शहरात प्रशासक राजवट सुरु झाल्यापासुन सर्व सामान्य जनतेच्या समस्यांची दिवसागणिक वाढ होत आहे. पालिकेत नगरसेवक नसल्याने प्रशासकांची मनमानी सुरू आहे. प्रशासक शोभाताई बाविस्कर जळगाव निवासी असल्याने त्या जळगाव येथून ये – जा करतात. वास्तविक पावसाळ्याचे दिवस असल्याने पावसाळापूर्व नियोजन करणे, नाले सफाई करणे, ज्या भागात पाणी साचते त्या भागाची पाहणी करून मान्सूनपूर्व उपाययोजना करणे, पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विविध रोगांसह आरोग्याचा प्रश्न मार्गी लावणे अत्यंत गरजेचे असताना प्रशासक मात्र जनतेच्या मुलभुत समस्यांसंदर्भात कोणताही विषय गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत. समजा एखाद दिवशी आल्या तर मुलभूत समस्या सोडवण्यासाठी नगरसेवकांना तासं-तास कॅबिनच्या बाहेर थांबावे लागते दुरध्वनी व्दारे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला तर प्रशासक फोन घेत नाहीत त्यामुळे नागरिकांचे प्रश्नही मार्गी लागत नाहीत.
पाचोरा शहराला पाणीपुरवठा करणारा के टी बंधारा कोरडाठाक झाल्याने पाणीपुरवठा पंधरा दिवसापासून आड होतो . तो सुद्धा अत्यंत दूषित पाणी पुरवठा केला जात आहे. शहरातील नागरिकांना आपल्या भागात पिण्याचे पाणी केव्हा येणार याची स्पष्ट नियोजन निहाय माहीती मिळत नाही जर जल कुंभावर जाऊन पाणी केव्हा येणार ?याची चौकशी करतात तेथे त्यांना समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. गटारी तुंबल्या आहेतI शहराच्या प्रमुख रस्त्यांवर ,चौकात व शहरालगतच्या वसाहतीत प्रचंड घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गटारी साफ केल्या जात नाहीत. आरोग्य विभागाची यंत्रणा कोलमंडली आहे त्यामुळे घाण उचलायला कोणीच यायला तयार नाही. पावसाने हजेरी लावल्यास या घाणीच्या साम्राज्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार असल्याच्या तक्रारी नागरिक नगरसेवकांकडे करतात. परंतु नगरसेवकांचेच म्हणणे प्रशासक ऐकून घेत नाहीत अथवा गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे नगरसेवकां बाबतचा नागरिकांचा गैरसमज वाढत आहे यासारख्या मुलभूत प्रश्नांचा अभ्यास करून त्यांची सोडवणूक करण्यासाठी प्रशासक बाविस्कर यांनी पाचोरा येथे थांबून नागरिकांना न्याय देणार का ?असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला असून हे विषय गांभीर्याने घेऊन या संदर्भात त्वरित कार्यवाही करावी. नागरिकांचे प्रश्न तसेच नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी प्रशासकांनी मुख्यालयी थांबून जनता दरबार घ्यावा म्हणजे सर्व समस्यांची त्यांना जाण होईल’ अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल व त्याची संपूर्ण जबाबदारी पालिका प्रशासकांची असेल असा इशारा माजी उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे गटनेते संजय वाघ यांचे सह राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुचेता वाघ, भूषण वाघ, विकास पाटील, वासुदेव महाजन, अशोक मोरे, रंजना भोसले, नीलिमा पाटील यांनी दिला आहे.